स्किनवरील आजार म्हणजे कोरोनाचे संकट तर नव्हे ना?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । साधारण एक वर्षांपूर्वीपासून कोरोनाचे संकट हे खूप त्रासदायक ठरत आहे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाच्या या महासंकटामुळे अनेकांचे जीव पण गेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात खूप काळजी घेणे अपेक्षित आहे. कोरोना हे संकट फक्त भारतावर आलेले नाही तर साधारण सर्व जगाला या संकटाचा सामना हा करावा लागत आहे. सर्दी, खोकला , ताप , घसा असे साधारण लक्षणे असतील तर कोरोना आहे हे साधारण लक्षात येते . स्किनवरील आजार म्हणजे कोरोना आहे का ? हे जाणून घेऊया . ….
त्वचेवर सूज येणे किंवा ऍलर्जी असणे हे देखील कोरोनाच्या संक्रमणाचे संकेत असू शकतात. त्वचेवर लाल चट्टे ही लक्षणं देखील बघण्यात येत आहे. अशी लक्षणं असल्यास बरं होण्यासाठी कालावधी देखील जास्त लागत असल्याचे कळून येत आहे. लहान मुलांमध्ये त्वचेच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवत असतील तर कोरोनाच्या समस्या या जास्त दिसून येतील .
कोरोनाच्या संक्रमण नसा आणि रक्तवाहिन्यांमध्ये पसरण्याचा धोका असल्यामुळे त्वचेवर जळजळ, पुरळ उठणे, लाल रंगाचे चट्टे येणे, तीव्र खाज येणे, त्वचा कोरडी पडणे असे लक्षणं असू शकतात. शरीरावर कोरडेपणा किंवा डाग दुर्लक्ष करता कामा नये. कोरोनाचा संसर्ग असेल तर घसा याला त्रास तर होतोच तसेच ओठांना सुद्धा कोरडेपणा हा जास्त जाणवतो. आपल्या शरीरात डिहायड्रेशन चे प्रमाण जर वाढले तर मात्र अश्या समस्या या जास्त जाणवतात. जर तुमचे ओठ हे निळे पडत असतील तर तेसुद्धा डिहायड्रेशन चे मोठे लक्षण आहे. आपल्या शरीराच्या कोणत्याही लक्षांकडे साधारण दुर्लक्ष न करणे गरजेचे आहे.