Skipping Dinner
| |

Skipping Dinner: रात्री उपाशी झोपण्याची सवय उडवेल कायमची झोप; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Skipping Dinner) अनेक लोकांना अख्खा दिवस थोड थोड थोड करतं खूप खाण्याची सवय असते. यामुळे अनेकदा संध्याकाळच्या वेळी त्यांना भूकच लागत नाही. याशिवाय दिवसभरातील कामाचा ताण, प्रवासाचा क्षीण शरिरातील ऊर्जेचे पतन करीत असते. यामुळे शरीराला आवश्यक तितकं आहार देणे अत्यंत गरजेचे आहे. पण वाढते वजन, थुलथुलित पोट अशा समस्यांनी हैराण व्यक्ती जेवू का नको अश्या विचारात जास्त गुंतलेली असते.

Full Plate Of Food

आजकाल कितीतरी लोक जाड असण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. पण जाड होण्याचे कारण केवळ आहार आहे ही समज अत्यंत चुकीची आहे. कोण सांगत खूप जेवल्याने वजन वाढत…? कोण सांगत भात खाल्ल्याने वजन वाढत…? कोण सांगत गोड खाल्ल्याने वजन वाढत…? अहो यांपैकी कोणताही पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही. तर हे पदार्थ खाण्याची पद्धत आणि खाण्याची मात्रा चुकल्यामुळे वजन वाढत. (Skipping Dinner)

एकदा का वजन वाढल की मग लोकांच्या डोक्यात वजन कमी कसे करायचे याचे नवनवीन फॉर्म्युला तयार होत असतात. शिवाय आपली आवडती हिरोईन किंवा हिरो किती भारी मेन्टेन आहे म्हटल्यावर तर असे लोक आणखीच बारीक होण्यासाठी प्रयत्न करतात. या प्रयत्नांपैकी सपशिल फसवा प्रयत्न म्हणजे रात्रीचे जेवण टाळणे. अनेकांचा असा गैरसमज आहे की, रात्रीचं जेवण टाळल्यास वजन पटकन कमी होतं. याला गैरसमज म्हणण्याचं कारण म्हणजे रात्री विनाकारण उपाशी झोपल्यामुळे वजन कमी होत नाहीच.. शिवाय आरोग्याशी संबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागते. (Skipping Dinner)

Eating

वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण सोप्पा, घरगुती आणि मनाजोगता पर्याय म्हणजे उपासमार. अमूक गोष्ट केल्यानं वजन कमी होतं असं कुणी सांगितलं की मग झालं. विविध तर्क आणि विविध उपाय करून आरोग्याची आपण स्वतःच रात्री उपाशीपोटी  झोपण्यामागे आहे. रात्रीचं जेवण टाळल्यास पटकन वजन कमी होतं या समजापोटी अनेकजण रात्री काहीही न खाता झोपतात. हे वारंवार घडल्यास वजन कमी होणं दूर आरोग्याच्या समस्या वाढतात. 

रात्री उपाशीपोटी झोपण्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असे तज्ञ सांगतात. एकंदरच काय की, रात्री उपाशी झोपल्यामुळे आरोग्याची हानी होते आणि विविध दुष्परिणाम भोगावे लागतात. चला तर जाणून घेऊया.

Skipping Dinner

० रात्री उपाशी झोपल्यामुळे काय होत..? (Skipping Dinner)

तज्ञ सांगतात की, रात्री उपाशी झोपण्याची सवय ही कोणत्याही गंभीर आजाराप्रमाणेच आहे. कारण ही सवय हळूहळू आरोग्याला इजा पोहोचवते. रात्री आपण झोपेत असताना शरीरातील आंतरक्रिया मंदावतात मात्र त्या आपले कार्य करीत असतात. अशावेळी आवश्यक ऊर्जा ही आपण रात्री ग्रहण केलेल्या आहारातून मिळत असते. (Skipping Dinner) पण रात्री जर आपण काही खाल्लंच नाही तर ही ऊर्जा कशी मिळेल. यामुळे आपली शारीरिक क्षमता कमी कमी होऊ लागते. दुसरा दिवस निरुत्साही होतो. याशिवाय पोटाच्या आतड्या दुखू लागतात. इतकेच काय तर विविध आजारांना सामोरे जावे लागते. चला तर जाणून घेऊया दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

Eating Disorder

उपाशी पोटी झोपण्याचे दुष्परिणाम

1. हार्मोन्सचे असंतुलन होते – रात्री जेवण टाळण्याची सवय अतिशय घातक असते. कारण रात्रीचं जेवण नीट न केल्यानं त्याचा वाईट परिणाम चयापचय प्रक्रियेवर होतो. उपाशी पोटी झोपण्यामूळे इन्सुलिनची मात्रा असंतुलित होते. ज्यामुळे कोलेस्टेराॅल आणि थायराॅइडची लेव्हलही बिघडू शकते.

Harmones

तसेच आरोग्याशी निगडित समस्या उद्भवतात. (Skipping Dinner) योग्य वेळी योग्य आहार घेतला नाही तर त्याचा परिणाम शरीरातील हार्मोन्सवर होतो आणि हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. म्हणून हार्मोन्सचं संतुलन बिघडू नये यासाठी रात्रीचे जेवण टाळू नका. अन्यथा हार्मोन्सचे असंतुलन विविध रोगांना आमंत्रण देऊ शकते.

Diabetes

2. रक्तातली साखर कमी होते – कमी रक्तातील साखरेमुळे लोकांना चिडचिड, गोंधळ आणि थकवा जाणवतो. शरीर कॉर्टिसॉलचे उत्पादन वाढवू लागते, ज्यामुळे आपण ताण तणाव येण्याची शक्यता वाढते. रात्रीचे जेवण वगळण्यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि इतर आरोग्यविषयक समस्या झपाट्याने वाढतात.

3. अशक्तपणा येतो – जे रात्री उपाशी पोटी झोपतात त्यांचे स्नायू हळूहळू अशक्त होण्याचा धोका असतो. कारण उपाशी पोटी झोपण्यामूळे शारीरिक ऊर्जा कमी होऊ लागते. इतकेच काय तर प्रथिनं आणि अमिनो ॲसिडच्या कार्यक्षमतेवरदेखील याचा परिणाम होतो. ज्यामुळे स्नायू अधिकाधिक कमजोर होऊ लागतात.

Weakness

तर स्नायू मजबूत राहण्यासाठी योग्य वेळी योग्य आहार घेणं महत्वाचं आहे. अन्यथा रात्रीची उपासमार तुमच्या आरोग्याची कधी पूर्ण वाट लावेल ते समजणारसुद्धा नाही. (Skipping Dinner)

4. निरुत्साही वाटते – साहजिकच भूक लागूनही काही खाल्लं नाही तर चिडचिड होते. त्यात उपाशी पोटी झोपल्याने त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर थेट होतो. भुकेचा परिणाम उत्साह, ऊर्जा आणि कार्यक्षमतेवर होतो.

रात्री जेवण टाळल्यास शरीरात ऊर्जा शिल्लक राहत नाही. ज्यामुळे खूप अशक्तपणा येतो आणि लवकर थकवा येतो. हा अशक्तपणा आणि थकवा दीर्घकाळ राहिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम करतो.

5. अनिद्रेचा त्रास होतो – रात्री काहीही न खाता पिता जर उपाशी पोटी झोपत असाल तर याचा परिणाम थेट तुमच्या झोपेवर होतो. म्हणजेच उपाशी पोटी झोपल्याने अनिद्रेची समस्या उद्भवते. रात्री उपाशी पोटी झोपल्यामूळे मेंदू आपल्याला भूक लागत असल्याचे संकेत देऊ लागतो.

Sleepless

काहीतरी खाण्यासाठी तो आपल्याला सतत सजग करत असतो. यामुळे भूकेची उत्पत्ती होते. (Skipping Dinner) पण भूक लागूनही काहीच खाल्लं नाही तर झोप येऊनही झोप लागत नाही. पुढे पुढे झोप न येण्याची ही सवय अनिद्रेची समस्या निर्माण करते.

Digestion

6. आतड्यांचे विकार होऊ शकतात – उपाशी पोटी झोपल्यामुळे आधीच शरीरातील ऊर्जा कमी झालेली असते. अनेकदा भूकेवर नियंत्रण मिळविण्याच्या नादात उपाशी राहिले जाते आणि याचा आतड्यांवर ताण येतो. परिणामी आतड्यांच्या आरोग्याचे नुकसान होते.

Weight Loss

7. वजन खूप वाढते किंवा खूप कमी होते – जर भूक लागूनही तुम्ही रात्री वजन कमी करायचे म्हणून जेवत नसाल आणि उपाशीच झोपत असाल तर तुम्ही चूक करताय. कारण याचा झोपेसाह वजनवरही गंभीर परिणाम होत असतो. भुकेमुळे जशी झोप लागत नाही आणि अनिद्रेचा त्रास बळावतो. तसाच अनिद्रेमुळे वजनावर विपरित परिणाम होतो आणि वजन एकतर खूप वाढते किंवा खूप कमी होते.  (Skipping Dinner)

‘हे’ पण वाचा :-

Health Tips: पाणी आणि दुधाचे ‘असे’ सेवन कराल तर 100% आजारी पडालं; जाणून घ्या

वारंवार भूक लागणे असू शकते ‘या’ आजाराचे कारण; जाणून घ्या

Healthy Vegetables: औषधी रानभाजी तांदुळजा खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

Wood Apple Benefits : ‘दुर्मिळ होतंय कवठाचं फळ, खाई त्याला येई बळ’; जाणून घ्या फायदे