Sleeping Hours : तुम्हाला किती झोपेची गरज आहे..?; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Sleeping Hours झोपेचे आणि आरोग्याचे अतिशय सलोख्याचे नाते आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, झोपेशिवाय दिनचर्येची गणितं सुव्यवस्थित चालत नाहीत. समजा तुम्ही खूप उशिरा झोपलात तर सकाळी साधारण किती वाजता उठू शकता..? आता तुमच्यापैकी काही जण सांगतील आम्ही कितीही वाजता झोपलो तरीही सकाळी पहाटेच ४ किंवा ५ वाजता उठतो. तर काही जण म्हणतील कितीही वाजता झोपा आम्ही १२ वाजताच उठतो. या दोन्ही सवयींमध्ये आत्मसाद करण्याजोगे काहीच नाही असे तज्ञ सांगतात. कारण फार कमी झोप किंवा फार जास्त झोप दोन्हीही आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
अनेकांची वारंवार तक्रार असते कि माझी झोप पूर्णच होत नाही. तर हे असे का होते….? कारण डोक्यात फिरत असणारे विचार, अस्थिर मन, उद्याची दिनचर्या, एखाद्या गोष्टीची काळजी अशा गोष्टींमुळे मेंदू पूर्ण शांत होत नाही. (Sleeping Hours) तर झोपेतही कार्य करीत असतो. ज्यामुळे त्याला आराम मिळत नाही. परिणामी दुसऱ्या दिवशी सतत झोप येते. कंटाळा येतो . अगदी कामातही मन लागत नाही आणि काही करायचा उत्साहदेखील राहत नाही.
‘लवकर झोपे, लवकर उठे त्यास आरोग्य भेटे’ अशी एक उत्तम म्हण घरातील मोठी मंडळी अनेकदा बोलत असतात. पण आपण आपल्याच धुंदीत असतो तर याकडे कधी लक्ष देणार. पण मित्रांनो उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे झोप पूर्ण होणे खरंच अत्यंत गरजेचे आहे.
झोप म्हणजे उत्तम आरोग्याचे साधन आहे. त्यामुळे झोपेबाबत निष्काळजी असून चालणारच नाही. मग झोप कशी घ्यावी..? किती घ्यावी..? असे अनेक प्रश्न साहजिकच मनात निर्माण होतात. तर याबाबत एका मानसशास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासात काही बाबी ठळकपणे दिसून आल्या आहेत. (Sleeping Hours)
जसे की, जे लोक रात्री बरोबर दहा वाजता झोपतात त्यांचे आरोग्य उत्तम असते. यामुळे जे लोक रात्री दहा वाजता झोपू शकत नाहीत त्यांनी रात्री दहाच्या आत झोपण्याचा प्रयत्न करावा असे तज्ञांनी सांगितले आहे. पण अनेकांना इतक्या लवकर आणि ठरलेल्या वेळेत झोपच येत नाही. मग बळजबरीने कास काय झोपणार..?
बर लवकर अंथरुणावर पडलो आणि झोपलोच तर तळमळ होत राहते. शिवाय किमान ७ ते ८ तास काही शांत झोप मिळत नाही. मधेच झोप चाळवली जाते आणि मधेच जाग आली की मग काय..? रात्रभर जागरण. (Sleeping Hours) काही लोकांना तर मधेच जाग आली कि पुन्हा झोपच लागत नाही. या अशा गोष्टींमुळे झोपेची थोडीथोडकी नाही तर पूर्णपणे वाट लागते. यावर काय उपाय करणार..?
मुख्य सांगायचे म्हणजे, झोप कशी लागेल हे झोपेपूर्वीचे ३ ते ४ तास ठरवतात. आपले संध्याकाळचे जेवण किती वाजता होते आणि दिवसातला शेवटचा चहा आपण किती वाजता घेतो..? यावर आपली झोप शांत असेल कि अशांत.. पूर्ण असेल कि अपूर्ण असे घटक अवलंबून असतात. त्यामुळे रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ तास आधी केलेच पाहिजे असे तज्ञांनी सांगितले आहे.
खरंतर आपण झोपेच्या बाबतीत निष्काळजी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला किती झोपेची गरज आहे हेच माहित नसतं. (Sleeping Hours) मग काय कधीही झोपा आणि कधीही उठा हेच काय ते आपलं झोपेचं रुटीन.. पण झोपेच्या अशा रुटीनमुळे आहाराच्या वेळाही बदलतात. परिणामी पोटाचेही हाल होतात. शारीरिक क्रियांमध्ये बिघाड होतो आणि परिणामी ये रे ये रे आजारा.. असं कसं चालेल.? म्हणूनच आपण जाणून घेऊ कि कोणत्या वयात किती झोपेची गरज असते. मग त्यानुसार तुम्हीही तुमचं टाईमटेबल बनवा आणि स्वस्थ तसेच मस्त जगा.
झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे आणि यामुळे अपुरी झोप किंवा जादा झोप आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच आपल्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आताच झोपेचे नियम पाळा. (Sleeping Hours) यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावणार नाही. मुख्य म्हणजे प्रत्येकाला आपल्या वय, प्रकृतीनुसार आवश्यक असणाऱ्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक असते हे माहित असायला हवे. म्हणूनच जाणून घेऊया कोणत्या वयात किती झोपेची आवश्यकता आहे.
० कोणत्या वयात किती झोप आवश्यक…? (Sleeping Hours)
तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार त्यांच्या अभ्यासात सिद्ध झालेल्या बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. ज्यामध्ये कोणत्या वयासाठी किती तास झोप आवश्यक आहे..? याचाही उल्लेख करण्यात आला आहे. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
नवजात बाळ (३ ते ११ महिने) – कमीत कमी १४ ते १५ तास झोप आवश्यक
१२ ते ३५ महिन्यांचे बाळ – १२ ते १४ तास झोप आवश्यक
३ ते ६ वर्षीय मुलं – ११ ते १३ तास झोप आवश्यक
६ ते १० वर्षीय मुलं – १० ते ११ तास झोप आवश्यक (Sleeping Hours)
११ ते १८ वर्षीय व्यक्ती – ९:३० तास झोप आवश्यक
मध्यमवयीन व्यक्ती – साधारण ८ तास झोप आवश्यक
वृद्ध व्यक्ती – साधारण ८ तास झोप आवश्यक
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाची एक झोपायची वेळ आणि तास सुनिश्चित असायला हवे. कारण प्रत्येकाच्या वयानुसार त्याच्या शारीरिक कार्यांची गती ठरत असते. मग काही जणांना ५ तास झोप पुरते तर काहींना १० तास झोपसुद्धा कमी वाटते. पण सध्याच्या धकाधकी आणि धावपळीमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे आरोग्यविषयक अनेक आजार होऊ शकतात. म्हणूनच झोपेबाबत निष्काळजीपणा करू नका. तर वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या वयोगटात आहात ते पहा आणि जीवनशैलीत सुधार आणा. (Sleeping Hours)
‘हे’ पण वाचा:-
रात्री झोप मोड झाली कि पुन्हा लागत नाही? करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
अपूर्ण झोपेमुळे डोळ्यांना सूज येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या