ज्वारीचे बियाणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। ज्वारी हे एक असे धान्य आहे, ज्याचा आयुर्वेदात उल्लेख केलेला आहे. ज्वारीची भाकरी हि साधारण गोडसर चवीची असते. याची टिकवण क्षमतादेखील अधिक आहे. ज्वारीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्येदेखील यात अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते.
आपल्याकडे ज्वारीचा उपयोग हा बहुतेकदा भाकरी करण्यासाठीच होतो. आहाराच्या दृष्टिकोनातून पाहता ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) ८-१०%, प्रथिने ९.४ – १०.४%, तंतुमय घटक १.२ ते १.६%, खनिजद्रव्ये १.० – १.६%, उष्मांक ३४९ किलो कॅलरीज, कॅल्शिअम २९ मिग्रॅ, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) ४७, थायमिन ३७ मिग्रॅ इतके घटक प्रति १०० ग्रॅममध्ये आढळतात. याशिवाय ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्यक अमिनो ऍसिड्स मर्यादित प्रमाणात आढळतात. तर पांढऱ्या ज्वारीत टॅनिन नावाचा ऍण्टी न्यूट्रिशनल (अपायकारी) घटक आढळत नाही, तो लालसर ज्वारीत भरपूर असतो. चला तर जाणून घेऊयात ज्वारीचे आरोग्यदायी फायदे:-
१) सर्दी आणि खोकल्यापासून आराम – हंगामी सर्दी आणि खोकला झाल्यास ज्वारीच्या बियांचा रस खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे जर तुम्ही या ज्वारीच्या बियांचा रस नियमित प्यायला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराचे घटक रोगांपासून संरक्षण होते.
२) हृदयाचे निरोगी आरोग्य – ज्वारीचा रस शरीरातून अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करतो. हा रस कोलेस्टेरॉल रक्तात येण्यापूर्वी शोषून घेतो. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. या व्यतिरिक्त, ज्वारी स्ट्रोकचा धोका देखील टाळते. यामुळे हृदयाची काळजी घेण्यास ज्वारी सक्षम आहे.
३) पचनप्रणालीसाठी फायदेशीर – ज्वारीमध्ये दोन प्रकारचे शरीरोपयोगी फायबर असतात. अघुलनशील आणि विद्रव्य. त्याचे अघुलनशील फायबर शरीरात असलेले चांगले बॅक्टेरिया मजबूत करतात तर विद्रव्य फायबर शरीरातील अतिरिक्त साखर शोषून घेतात. यामुळे पचनसंस्था योग्य कार्य करू लागते आणि सुधारते.
४) शारीरिक अशक्तपणा दूर – अशक्तपणा किंवा रक्ताशी संबंधित इतर कोणत्याही समस्या असतील तर ज्वारीचा रस प्यायल्याने काही दिवसात सहज त्यातून सुटका मिळू शकते. कारण व्हीटग्रास ज्यूस आणि रक्ताचा पीएच गुणक फक्त ७.४ आहे. अशा परिस्थितीत, ते रक्तात खूप वेगाने मिसळते.
५) हाडांसाठी लाभदायक – ज्वारीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते आणि कॅल्शियम हे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे ज्वारीचे सेवन केले असता शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही आणि यामुळे हाडं मजबूत राहतात. इतकेच नव्हे तर, शरीराला ऑस्टियोपोरोसिसच्या जोखमीपासून वाचवते आणि दातांच्या आरोग्याची काळजी घेते.
६) अल्सरपासून रक्षण – ज्वारीमध्ये क्षारीय खनिजे असतात. हि खनिजे अल्सर, बद्धकोष्ठता आणि अतिसारापासून आराम देतात. शिवाय हे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. अशा स्थितीत एक्जिमामध्ये आराम मिळतो.