|

नवमातांसाठी खास – आपल्या बाळाला स्वतःच करा मसाज; जाणून घ्या कारण आणि स्टेप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घरामध्ये एखादं लहानगा बाळ जन्माला आलं कि घर कसं उत्साही आणि प्रफुल्लित होऊन जातं. घरातले मोठे थोर मंडळी त्या लहानग्या जीवाचे कोड कौतुक करण्यासाठी अगदी स्वतः लहान होऊन जातात. अश्यावेळी बाळाची आज्जी आणि आजोबा अतिशय आग्रही असतात. प्रत्येक लहान गोष्टीत ते बाळाच्या सुदृढ आरोग्याचा विचहर करतात. तर बाळाचे पालक त्याच्या आरोग्यासाठी नियोजन करीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कार्यरत असतात.

आपल्याकडे परंपरागत बाळाच्या शरीराची मालिश करणे, त्याला धुरी घालणे, घट्ट बांधून ठेवणे अश्या गोष्टी केल्या जातात. मुख्य म्हणजे यासाठी विशेष मावशी बोलावल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? कि बाळाला मालीशवाल्या बाईंकडून मसाज करुन घेतल्याने बाळाची अवस्था संभ्रमी होते. होय बाळ विशेष करून मालिश करणाऱ्या मावशीकडे विशिष्ट पद्धतीने आकर्षित होत असते आणि त्याला त्यांचा लळा लागतो. याशिवाय काही मालिश करणाऱ्या स्त्रियांचा हात जाड असतो ज्यामुळे तान्हुल्या बाळाला त्रास होऊ शकतो. परिणामी आपल्या बाळाला होणार त्रास पाहून कोणत्या आईचा जीव थाऱ्यावर राहील? म्हणून अनेक बाल तज्ञ सांगतात कि बाळाच्या शरीराची मॉलिश त्याच्या आईनेच करावी. कारण आई आपल्या बाळाला प्रेमाने आंजारून गोंजारून हलक्या हाताने मॉलिश करते. याशिवाय बाळाचे आणि आईचे नाते सखोल दृष्टीने पाहता अधिकच सुध होते.

– तज्ञांच्या मते, बाळाला आराम मिळावा व त्याला बरे वाटावे यासाठी मॉलिश केली जाते. म्हणून बाळाच्या पालकांनीच अगदी हलक्या हाताने व प्रेमाने बाळाच्या हाडांना मजबुती देणारे तेल वापरून त्याच्या शरीराचा व्यवस्थित मसाज करावा. यामुळे बाळासोबत त्यांचे एक छान आणि गोड नाते जोडले जाते. याशिवाय बाळाच्या सुरक्षेसाठी त्याचे आई- वडील वा घरातील ज्येष्ठ व्यक्ती जसे कि आज्जी नाहीतर पणजीदेखील बाळाला नक्कीच मॉलिश करु शकतात. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण बाळाला मसाज करायचा तरी कसा? तर काही काळजी करू नका. यासाठी फक्त हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या स्टेप बाय स्टेप खालीलप्रमाणे:-

  • बाळाला शरीराच्या वरच्या बाजूने मसाज करायला सुरुवात करावी.
  • कपाळाच्या मध्यापासून सुरु करून आपल्या अंगठ्याने नाक आणि इतर बोटांनी बाळाचा चेहरा हलक्या हाताने मसाज करावा.
  • अगदी कपाळापासून सुरवात करून डोळ्यांभोवती हळू हळू गोलाकार बोटे फिरवत मसाज करा.
  • यानंतर ओठांच्या मध्यापासून ओठांच्या वरच्या भागावर हळुवार क्रमशः मसाज करा. यासाठी आपल्या अंगठ्याचा हलक्या पद्धतीने वापर करावा.
  • पुढे हनुवटीच्या मध्यापासून ओठांच्या कडेपर्यंत पूर्णतः मसाज करा. यावेळी मसाज करताना अंगठ्याच्या मदतीने खालून वर अशा पद्धतीने करावा.
  • त्यानंतर बाळाच्या छातीचा भाग चार बोटांच्या आता अंगठा घेत हलक्या हाताने मसाज करा.
  • बाळाच्या छातीचा भाग व्यवस्थित मसाज झाल्यावर त्याच्या पोटाजवळील भागाला मसाज करा. यावेळी बाळाच्या मानेचा तोल जाणार नाही याची काळजी घ्या.
  • पुढे बाळाची छाती व पोट या दोन्ही भागांवर बाळाच्या उजवीकडून डावीकडे अश्या पद्धतीने मसाज करावा.
  • यानंतर हळू हळू गोलाकार पद्धतीने छाती, पोट, मांड्या आणि पायांवर मसाज करावा.
  • आता बाळाच्या हाताखालच्या भागाला आणि हाताच्या तळव्याला व्यवस्थित मसाज करा. यासाठी सर्वप्रथम उजव्या बाजूला हलक्या हाताने मसाज करावा.
  • आता दुसऱ्या हाताच्या खालच्या भागाला आणि हाताच्या तळव्याला मसाज करा.
  • बाळाच्या दोन्ही हाताला मसाज करताना त्याचे तळहात आणि बोटं यांना देखील मसाज करायाला विसरू नका.
  • त्यानंतर सगळ्यात शेवटी बाळाच्या तळपायाला मसाज करा. दरम्यान पायांच्या बोटांना आणि बोटांमधील खाचांना मसाज करायला विसरू नका.

० अत्यंत महत्वाचे – बाळाचा मसाज करताना घ्यावयाची काळजी.
१) बाळाच्या अवयवांवर मसाज करताना पायावरून त्याची घसरण होणार नाही याची काळजी घ्या.
२) मसाज करतेवेळी बाळाची मान अस्थिर नसावी.
३) बाळाला हाताळताना वास्तूप्रमाणे हाताळू नये. प्रेमाने आणि मायेने अलगद हाताळावे.
४) तेलाचे हात बाळाच्या डोळ्यांत लागणार नाहीत याची काळजी घ्यावी.
५) बाळाच्या मालिशसाठी कोणतेही सुगंधी आणि केमिकलयुक्त तेल वापरू नये.