Special tips for those who are more fond of tea
|

चहाचे जास्त शौकीन असणाऱ्या लोकांसाठी खास टिप्स

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  अनेक जण दिवसाची सुरुवात हि चहाच्या कपानेच करतात. जर दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने झाली नाही तर मात्र दिवसाचे कोणतेच काम तितक्या उत्साहाने केले जात नाही. त्यामुळे चहा हा लागतोच पण जर चहाचे प्रमाण जास्त असेल तर मात्र आपल्याला ते आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे चहा पिणाऱ्या लोकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत . कधी कधी या चहाची इतकी तल्लप असते कि, आपल्याला पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. पण, हाच चहा कधी-कधी अतिसेवनाने आपल्या आरोग्यावर परिणामकारक ठरतो. अ‍ॅसिडिटी, अपचन, भूक न लागणे, आदी गोष्टी जाणवतात. चहा किती प्यावा, चहात साखरेचे प्रमाण किती असावे हे देखील प्रत्येकाच्या सवयीवर अवलंबून असते. त्यामुळे चहा पिताना काळजी घेणे गरजेचे आहे.

चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत .आल्याचा चहा हा ज्यावेळी डोके दुखीचा त्रास जास्त प्रमाणात होतो त्यावेळी घेतला जातो. परंतु निश्चितच चहामुळे तंदुरुस्ती जाणवते, फ्रेश वाटते. काम करण्यास उत्साह वाढतो. त्यात अजून आल्याचा चहा असेल, तर तो सर्दी-डोकेदुखीही कमी करतो. मात्र, चहाचे सेवन किती करावे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कधी-कधी जेवणाच्या आधी चहा घेतला, तर नंतर भूक लागत नाही. मग त्याचा परिणाम भुकेवर होऊन आपले आहाराचे वेळापत्रक बिघडून जाते. काहींना सकाळ, संध्याकाळ असा चहा लागतो. इतर वेळी चहाचा वासही चालत नाही. मात्र, वारंवार चहा पिणा-यांचे काय? जसे चहा आपल्याला ताजेतवाने बनवते, तसे त्याचे काही दुष्परिणामही दिसून येतात.

अ‍ॅसिडिटी —–

वारंवार चहा प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो. सकाळी उठल्या-उठल्या चहा पिणे, वारंवार चहा पिण्याची सवय असणे, जेवणाआधी.. जेवणानंतर लगेचच चहा पिणे. आदी चहा पिण्याच्या सवयीने अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते.

भूक न लागणे —

चहा प्यायल्याने भूक मरते. जेवणाच्या वेळी चहा प्यायल्यास, त्याचा परिणाम भुकेवर होतो. चहामुळे भूक लागत नाही. ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात अनेकदा चहाचे सेवन केले जाते. परिणामी जेवणाची वेळ टळून कधी जाते, हे देखील अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. याचा परिणाम आरोग्यावर होऊन आजारी असल्यासारखे वाटणे, शरीर कृश वाटणे, आदी गोष्टी जाणवतात. लहान मुलांना त्याची सवय जास्त लावू नये. कारण त्याचा परिणाम हा मुलांच्या भूकेवर होतो.

निद्रेवर परिणाम —

अनेक वेळा असे म्हंटले जाते कि, जर तुम्हाला जागरण करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही चहाचे प्रमाण जास्त ठेवले जाते. पान त्यामुळे ज्यावेळी झोप  गरजेची आहे . त्यावेळी मात्र झोप हि जास्त प्रमाणात लागत नाही. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवतो. अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी वाढते. आपणास किमान सहा तास झोप आवश्यक असते आणि ती नसेल, तर शारीरिक व्याधी बळावू शकतात. त्यामुळे आपल्याला कमीत कमी ६ ते ८ तास झोप असणे गरजेचे आहे.