Stomach Pain
|

Stomach Pain: पोटदुखी थांबत नाही? तर ‘हे’ 8 घरगुती उपाय करून पहाच; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पोटदुखी (Stomach Pain) हा काही रोग नाही मात्र आरोग्यविषयक समस्या जरूर आहे. त्यामुळे साधी सुधी पोटदुखी कधी गंभीर आजाराकडे वळेल हे काही सांगता येत नाही. म्हणून तज्ञ सांगतात कि, पोटदुखी साधी असो वा गंभीर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे आणि या साठी त्याकडे दुर्लक्ष मुळीच करू नये.

पोटदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. खूप वेळ उपाशी राहणे, चुकीचे पदार्थ खाणे, पोटावर झोपणे हि सामान्य कारणे आहेत. तर बद्धकोष्ठता, जंत होणे, जळजळ होणे, अल्सर, मुतखडा, अपेंडिक्स, फूड पॉईजनिंग, आतड्यांना सूज येणे, पोटाचा कॅन्सर, पित्ताशयाला सूज येणे, आतड्यांमध्ये रक्ताची कमतरता, पॅनक्रियामध्ये सूज अथवा संक्रमण, मासिक पाळी, पित्ताशयातील खडे हि यातील काही गंभीर कारणे आहेत. (Stomach Pain)

Stomach Pain

कितीतरीवेळा पोटात दुखतंय फक्त उजव्या किंवा डाव्या बाजूला दुखू लागते. तर अनेकदा ओटीपोट धरून बसावं लागत. विविध कारणांमुळे हि विविध पोटदुखी होते. अनेकदा हि पोटदुखी असह्य होते. त्यामुळे आपण डॉक्टरांकडे जाणे योग्य समजतो. पण प्रत्येक पोटदुखीसाठी डॉक्टरची आवश्यकता नाही. कारण तुमच्या घरात पोटदुखीवरील जालीम उपाय उपलब्ध आहेत. (Stomach Pain) पण हे घरगुती उपाय प्रत्येकाला माहित असतीलच असे नाही. म्हणून आज आपण पोटदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

पोटदुखीवर घरगुती उपाय
(Stomach Pain Home Remedies)

१) तुळस

० साहित्य – ७ ते ८ तुळशीची पाने, १ कप गरम पाणी

० बनविण्याची पद्धत – पाण्यात बारीक वाटलेली तुळशीची पाने घालून पाणी उकळवा. हे पाणी दिवसातून २ वेळा प्या. शिवाय तुळशीची पाने नुसती चाऊनही खाता येतील.

० फायदा – तुळशीमध्ये अँटिअल्सर आणि अल्सरवर चांगला परिणाम करणारे गुण असतात. त्यामुळे तुळस अल्सरवर सकारात्मक आणि प्रभावी ठरते. यामुळे पोटदुखी थांबते आणि अन्य रोगांपासूनही संरक्षण मिळते.

२) हिंग

० साहित्य – चिमूटभर हिंग, एक ग्लास कोमट पाणी, चिमूटभर काळे मीठ (सैंधव)

० बनविण्याची पद्धत – सर्वात आधी पाणी कोमट करून घ्या. आता त्यामध्ये हिंग आणि सैंधव मीठ व्यवस्थित मिसळून त्याचे हळूहळू सेवन करा. ही प्रक्रिया दिवसातून २ ते ३ वेळा करा

asafoetida.

० फायदा – हिंगामधील अँटिस्पास्मोडिक गुणांमुळे पोटदुखी कमी होते. हा उपाय घरगुती उपायांपैकी एक जालीम उपाय आहे. तसेच पोटात गॅस होत असेल तर त्यावरही हिंग परिणामकारक आहे. (Stomach Pain)

३) आले

० साहित्य – १ चमचा किसलेले आले, १ चमचा चहा पावडर, १ १/२ कप पाणी, १ चमचा मध, ५ ते ६ थेंब लिंबाचा रस

० बनविण्याची पद्धत – सर्वात आधी पाण्यात आल्याचे तुकडे टाकून उकळवा. त्यानंतर त्यामध्ये चहा पावडर घालून पुन्हा उकळवा. हे पेय कपमध्ये गाळून घ्या आणि त्यात मध तसेच लिंबाचा रस मिसळून हळूहळू प्या. दिवसातून २ ते ३ वेळा हे पेय प्या.

Dry Ginger

० फायदा – आल्यामध्ये अँटिअल्सर गुण असतात. जे पोटदुखीला कारणीभूत अल्सरवर रोख लावतात. शिवाय यामध्ये अँटिट्यूमर गुण असतात. ज्याच्या मदतीने पोटात ट्यूमर होत नाही. शिवाय पोटात गोळा येत असेल वा पोट साफ होत नसेल तर आलं त्यावरही प्रभावी आहे.

४) ओवा

० साहित्य – १/२ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा ओव्याची पावडर, १/४ चमचा आले पावडर, १ ग्लास कोमट पाणी

० बनविण्याची पद्धत – जिरे, ओवा आणि आल्याची पावडर कोमट पाण्यात व्यवस्थित मिसळून याचे सेवन करा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी हे प्या. यामुळे पोटदुखीतून सुटका मिळेल.

benifits of ova

० फायदा – ओव्यामध्ये अँटिस्पास्मोडिक गुण असतात. तसेच कार्मिनेटिव्ह गुणही असतात. जे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या दूर करतात. शिवाय गॅससह पोटातील अपचनाची समस्या, डायरिया, पाईल्सवरदेखील ओवा घरगुती उपाय म्हणून फायदेशीर आहे.

५) जिरे

० साहित्य – ५ ग्रॅम जिरे

० बनविण्याची पद्धत – थोडेसे जिरे तव्यावर हलके भाजून घ्या. आता भाजलेल्या जिऱ्याचे दिवसातून २ ते ३ वेळा चावून सेवन करा.

cumin

० फायदा – पोटदुखीवर घरगुती उपाय म्हणून जिऱ्याचा उपयोग होतो. जिऱ्याचा अर्क पोटातील दुखणे, गाठ अथवा कळ येणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठ यासारख्या समस्यांवर प्रभावी असल्यामुळे पोटदुखीवर सहज आराम मिळतो. (Stomach Pain)

६) अॅपल साईड व्हिनेगर

० साहित्य – १ चमचा अॅपल साईड व्हिनेगर, १ कप गरम पाणी, १/२ चमचा मध

० बनविण्याची पद्धत – गरम पाण्यात अॅपल साईड व्हिनेगर आणि मध मिसळून याचे सेवन करा. जास्त त्रास होत असेल तर दिवसातून २ वेळा हे पेय प्या. (Stomach Pain)

० फायदा – कोणताही बॅक्टेरिया शरीराला नुकसान पोहचविण्याचे काम करत असेल आणि मूत्रमार्ग संक्रमण वा पचनसंबंधित समस्या निर्माण करत असेल तर अॅपल साईड व्हिनेगरचा उपयोग होतो. यातील अँटीमायक्रोबायल गुण विषाणूंपासून रक्षण करतात आणि पोटदुखी दूर करतात.

७) बडिशेप

० साहित्य – १ चमचा वाटलेली बडिशेप, १ कप पाणी, १/२ चमचा मध

० बनविण्याची पद्धत – पाण्यामध्ये वाटलेली बडिशेप घालून साधारण १० मिनिट उकळवा. यानंतर हे पेय थंड करून गाळून यामध्ये मध मिसळून प्या. दिवसातून २ वेळा हे पेय प्या.

Saunf

० फायदा – अपचनाच्या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी बडिशेप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी बडिशेपेमध्ये असणारे एनेथॉलमध्ये अँटीमायक्रोबाल गुण मदत करतात. तसेच हा गुण इरिटेबल बाऊल सिंड्रोमला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंवर मात करून मांसपेशींचे रक्षण करतात. ज्यामुळे पोटदुखी दूर होते.

८) तांदळाचे पाणी

० साहित्य – १ कप तांदूळ, ४ कप पाणी, १ चमचा मध

० बनविण्याची पद्धत – आधी पाणी उकळून त्यात धुतलेले तांदूळ घालून शिजवा. भात शिजला कि त्याचे पाणी गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झालेल्या पाण्यात मध मिसळून प्या . दिवसातून २ वेळा हे पेय प्या.

Rice Water

० फायदा – अपचनाने पोट दुखत असेल तर त्यावर तांदळाचे पाणी पिणे हा जालीम उपाय आहे. कारण हे पाणी गॅस आणि अपचनाची समस्या नष्ट करून पोटदुखीपासून सुटका देते. (Stomach Pain)

‘हे’ पण वाचा :-

जेवणांतर एक चमचा मध घेऊन पोटाच्या समस्या करा दूर