घराच्या घरी अशी घ्या पायांची काळजी
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपले पाय हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कपड्यांच्या आत असतात. त्यामुळे आपले पाय खराब आहेत कि चांगले याचा संबंध मात्र कोणत्याच गोष्टीशी लागत नाही. पण कधी कधी आपण शॉर्ट्स घालतो. त्यामुळे आपले पाय हे उघडे राहतात. त्यामुळे आपले पाय सुंदर दिसावे असे वाटत असेल तर मात्र पायांची काळजी घेणे गरजेचे असत
—- बेकिंग सोडा
बेकिंग सोडा सगळ्यांच्या किचनमध्ये असतोच.घरी आल्यानंतर जर तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळत असेल .तर तुम्हाला हा प्रयोग करायला हरकत नाही. गरम पाण्यात तुम्हाला १ मोठा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. या पाण्यात तुम्हाला तुमचे पाय २० ते ३० मिनिटे ठेवायचे आहेत. पाण्यातून पाय काढून तुम्हाला ते कोरडे करुन घ्यायचे आहेत. तुम्हाला पाय कोरडे केल्यानंतर लगेचच पायात झालेला बदल जाणवेल. शक्य असल्यास हा प्रयोग रोज करण्यासही काही हरकत नाही.
— बनाना मास्क
त्वचा मुलायम होण्यासाठी केळ देखील वापरले जाते. घरी एखादे पिकलेलं केळं असेल तर ते स्मॅश करुन घ्या आणि तुमच्या पायांना केळ्याची पेस्ट लावा. हा मास्क पूर्ण वाळल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून घ्या. कोरडे करुन त्यावर मॉश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदा तरी केळ्याचा मास्क लावा.
— कॉफी स्क्रब
पायावरील मृत त्वचा काढण्यासाठी कॉफी हा चांगला पर्याय आहे. आता कॉफी महाग असे तुम्हाला वाटेल. पण बाजारात जाडी भरडी कॉफी पावडर मिळते. जी तुम्ही पीत असलेल्या फिल्टर कॉफीचाच उरलेला भाग असते. एका भांड्यात ३ ते ४ चमचे जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात लिंबाचा रस घालून थोडी थीक पेस्ट तयार करुन घ्यायची आणि ती पायाला चोळायची आहे. कॉफी तुमच्या पायावरील घाण काढून टाकते. शिवाय तुमची त्वचा कोमल करते.
— व्हॅसलीन मास्क
व्हॅसलीन किती उपयोगी आहे हे आता सांगायलाच नको. ओठांपासून ते पायांच्या तळव्यांपर्यंत व्हॅसलीन लावण्याचा सल्ला दिला जातो. व्हॅसलीन जेली घेऊन तुम्हाला ती संपूर्ण पायाला लावायची आहे.व्हॅसलीन पायावरुन जाऊ नये आणि तुम्ही घसरुन पडायला नको म्हणून तुम्ही मोजे घालायला हवे.त्यामुळे हा प्रयोग रात्रीच्यावेळी करुन पाहिल्यास उत्तम. शिवाय पायांना भेगा पडल्या असतील तरी व्हॅसलीनने त्या भरुन निघतात.
— ओट्स
ओटस जितके सुदृढ शरीरासाठी पौष्टिक असतात तितकेच ते तुमच्या त्वचेसाठी चांगले असतात. एका भांड्यात तुम्हाला ओट्स,दही, हळद एकत्र करायचे आहे. तयार पेस्ट तुम्हाला पायांना चोळायची आहे. त्यात हळद घालण्याऐवजी लिंबू पिळू शकता. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि ब्लिचींग एजंट तुमच्या पायांची नखे टणक करते शिवाय तुमच्या तजेलदार त्वचेला आवश्यक असलेले व्हिटॅमिन सी पुरवते. त्याचामध्ये मध सुद्धा घालू शकतो.