वेळेआधी मासिक पाळी यावी म्हणून काय कराल?; जाणून घ्या सोप्पे घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी आणि त्या दरम्यान होणाऱ्या समस्या दोन्ही नाजूक विषय आहेत. सर्वसाधारणपणे मासिक पाळीचा त्रास हा ४ ते ५ दिवसांपायांत होतो तर काही महिलांना ७ दिवसदेखील होतो. बहुतेकदा कामानिमित्त बाहेर जायचं असतं किंवा कोणत्याही सणासमारंभाच्या दिवसांमध्येच मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी मासिक पाळी लवकर यावी असे वाटते. मग काही जणी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मासिक पाळी लवकर यावी म्हणून गोळ्या घेतात. पण यामुळे आरोग्याचे नुकसान होते.
खरं तर मासिक पाळी येण्याची तारीख आणि वार हा शिक्कामोर्तब नसतो. साधारण २८ दिवसांनी पाळी येते. पण काही जणींच्या बाबतीत ही तारीख बऱ्याचदा मागेपुढे होत राहते. तर कधी कधी बरेच दिवस उलटून गेले तरी मासिक पाळी येत नाही. अशावेळी आपली अधिक चिडचिड होते. पाळी उशीरा आली किंवा आधी आली तर या दोन्ही गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे पाळी वेळेवर येणे गरजेचे असते. त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय करायचेच असतील तर घरगुती सुद्धा करता येतात. ज्यामुळे शरीरावर अन्य कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि करण्यासाठी सुद्धा सोप्पे आहेत.
चला तर जाणून घेऊयात उपाय –
१) हळद – हळदीचा मूळ गुणधर्म उष्ण आहे. त्यामुळे दिवसातून एकदा दुधातून हळद घालून घेतल्याचा फायदा होतो. शिवाय हळद आणि दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हळद ही अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. त्यामुळे मासिक पाळी लवकर आणण्यासाठी हळद १००% उपयुक्त आहे. मुळात असे केल्याने मासिक पाळीच्या दिवसात त्रासही होत नाही आणि पोटदुखी कमी होते.
२) आलं – आलं हे मुळातच उष्ण असते. त्यामुळे आल्याचा चहा पिऊन मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्रयत्न करता येतो. पण याचा अतिरेक करू नका. आलं आरोग्यासाठी चांगलं तेव्हढंच वाईट. त्यामुळे आल्याचा चहा दिवसभरातून दोन वेळा जरी प्यायलात तरी मासिक पाळी लवकर आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
३) ओवा – ओवा पोटातील आजारांवर उत्तम उपाय. शिवाय ओवासुद्धा उष्ण असतो. त्यामुळे ज्या महिलांना मासिक पाळी उशीरा येण्याचा त्रास आहे, त्यांनी गुळासोबत ओवा खावा. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यासाठी १ चमचा ओवा आणि १ चमचा गूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्यावे. यामुळे मासिक पाळी लवकर येते. शिवाय त्याचा त्रासही होत नाही.
४) कच्ची पपई – कच्ची पपईदेखील अत्यंत उष्ण स्वभावाची असते. शिवाय ते एक नैसर्गिक फळं असून ते खाल्ल्याने प्रकृतीस अन्य बाधा होत नाहीत. म्हणून कच्ची पपई खाल्लाने मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. शिवाय पाळी संदर्भातील सर्व तक्रारी दूर होतात. कारण पपईत भरपूर पोषण आणि अॅन्टी ऑक्सिडंट असतात.
५) ऊसाचा रस – ऊसामध्येही उष्णता अधिक असते. त्याशिवाय ऊसाच्या रसामध्ये लिंबू आणि आलं मिसळले जाते. त्यामुळे मासिक पाळी लवकर आणण्यासाठीही हादेखील एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे.