चेहऱ्याच्या खाली वाढलेली चरबी कमी करण्यासाठी या करा उपाययोजना
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या चेहऱ्यावर जर चरबी वाढली तर ते मात्र आपल्या दिसण्यात खूप फरक हा पडलेला दिसून येतो. चेहऱ्यावरची जर चरबी वाढली असेल तर त्यावेळी आपला चेहरा हा अजिबात चांगला दिसत नाही . काही वेळा आपल्या चेहऱ्यावर चरबी वाढत आहे . तेच लक्षात येत नाही . चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत , ते जाणून घेऊया ….
अशा प्रकारे ओळखा चेहऱ्यावरची चरबी
अनेक वेळा आपल्या चेहऱ्यावर जमलेली चरबी हि दिसतच नाही . पण जर चेहरा हा खूप जास्त फुगला असेल तर त्यावेळी मात्र चरबी हि जास्त वाढली असल्याचे लक्षात येते. अनेक वेळा आपल्या मानेच्या आणि गालाच्या भोवती चरबी हि जास्त प्रमाणात साठायला सुरुवात होते . त्यालाच फेस फॅट अर्थात चेहऱ्यावरची चरबी असं म्हटलं जातं. चेहऱ्यावर जर चरबी जास्तच वाढली तर चेहरा हा मोठा दिसायला सुरुवात होते .
चरबी वाढण्याची काय आहेत कारणे —
अनुवंशिकता —
जर तुमच्या घरात पहिल्यापासूनच कोणी लठ्ठ असेल तर त्यावेळी तसाच लठ्ठपणा हा तुमच्या शरीरात पण वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनुवंशिकता हे त्याचे मोठे कारण आहे. चरबीचा त्रास जर तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांना सुद्धा असेल तर त्यामुळे गाल फुगण्याच्या समस्या या वाढू शकतात . तुमच्या चेहऱ्याची रचना हि आई वडिलांकडून आलेली असते . त्यामुळे तश्याच पद्धतीने तुमचा चेहरा हा दिसायला सुरुवात होते .
हार्मोनल बदल—
जर तुमच्या शरीरात काही हार्मोनल बद्धल होत असतील तर त्यावेळी मात्र अशा काहीशा समस्या या जाणवतात. महिलांच्या मासिक पाळीच्या काळात काही वेळा तुमच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते. जर तुम्हाला थॉयरॉईड असेल तर त्यावेळी सुद्धा तुमचा गाल हा जास्त फुगला जातो. तुमच्या वजनात वाढ झाली असेल तर त्यावेळी सुद्धा तुमच्या गालात चरबीचे प्रमाण हे वाढू शकते .
डिहायड्रेशन —
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यावेळी सुद्धा तुमचे गाल वगैरे फुगण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे तोंडावरची चरबी हि खूप वाढू शकते . ज्यावेळी शरीर डिहायड्रेशन करू शकते. त्यावेळी तुमचे शरीर जेवढे पाणी शोषून घेता येईल असाच विचार करत असते . अनेकांना हे माहीतच नसते कि , तुमच्या शरीराच्या काही भागात पाणी हे स्टोअर केले जाते.
दारू पिणे अजिबात योग्य नाही —
आपण जर आपल्या आहारात दारूचे प्रमाण हे जास्त ठेवले तर मात्र त्यामध्ये असलेल्या अल्कोहोल मुळे सुद्धा वजनात वाढ होण्यास सुरुवात होते .सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारची दारू पिणे किंवा ध्रुम्रपान करणे या गोष्टी अजिबात योग्य नाहीत . बीअर, ब्रँडी यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि पोषक तत्व नसतात. ज्यामुळे तुमचं शरीर अधिक प्रमाणात डिहायड्रेट होतं.
अयोग्य आहार —
आपल्या आहारात जर नेहमी बाहेरच्या वस्तू ठेवल्या तर मात्र आपल्याला त्रास हा होऊ शकतो. पोटाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या या दूर होण्यास मदत होऊ शकते . आहारात नेहमी योग्य प्रकारचे कार्बोहायड्रेस , जंक फूड असे पदार्थ ठेवले जाऊ नयेत . त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी हि साठत जाते . तसेच कमी प्रमाणात पोषक तत्वे मिळाली तर मात्र त्याचा परिणाम सुद्धा आपल्या आरोग्यावर होत असतो.