Teeth Pain Relief – भाग 2: दातदुखीने केलं हैराण..? तर ‘या’ उपायांनी मिळवा आराम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन| आपण भाग १ मध्ये अचानक दातदुखी का होते..? याची कारणे जाणून घेतली. यानंतर आज आपण भाग २ मध्ये दातदुखीवरील उपाय जाणून घेणार आहोत. (Teeth Pain Relief)
आपण पाहिले कि दात नीट स्वच्छ न केल्याने आपण खाल्लेल्या अन्नाचे कण हे दातांच्या फटीत अडकून राहतात. काही काळ हे कण असेच राहिल्याने कुजतात आणि याचा परिणाम दातांवर होतो. याशिवाय दातांची अस्वच्छता विषाणूंना आमंत्रण देते. ज्यामुळे दात किडणे, हिरड्या दुखणे आणि प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. दातदुखी ही आबालवृद्धांमध्ये आढळणारी अत्यंत त्रासदायक आरोग्यविषयक समस्या असून बर्याच जणांना दात किडल्यामुळे दातदुखीचा त्रास होतो. (Teeth Pain Relief) पण दात किडण्यासोबतच अन्य अशी अनेक कारणे आपण पाहिली ज्यामुळे दातदुखी होते.
यामध्ये हिरड्यांमध्ये संसर्ग, कॅव्हिटी, अपघात, फ्रॅक्चर, चावण्याची चुकीची पद्धत, दात चावण्याची सवय, दातांमधील कमकुवत टिश्यू, दात घासण्याची चुकीची पद्धत, अक्कल दाढ येणे, वाकडे दात अशा कारणांचा प्रामुख्याने समावेश आहे. दातदुखीची काही दुर्मिळ कारणे देखील असतात. (Teeth Pain Relief) ज्यामध्ये दात वा हिरड्यांमध्ये संसर्ग असू शकतो. यामुळे सहसा सह उच्च सीआरपी आणि ताप येतो. शिवाय तोंडाचा कर्करोग हे देखील एक गंभीर कारण असू शकते. तसेच मज्जातंतू दुखणे यामुळेही दातांमध्ये वेदना असू शकतात. यानंतर आज आपण दातदुखीवर अस्सल प्रभावी असे उपाय जाणून घेणार आहोत. लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
दातदुखीवर प्रभावी नैसर्गिक घरगुती उपाय
(Teeth Pain Relief)
अनेकदा विविध कारणांमुळे अचानक दातदुखीचा अनुभव येतो. अशावेळी होणाऱ्या वेदना या अतिशय त्रासदायक असतात. त्या कमी करण्यासाठी विविध घरगुती आणि नैसर्गिक उपायांचा वापर करण्याचा सल्ला तज्ञ देतात. कारण घरगुती उपाय तसेच नैसर्गिक उपाय हे निसर्गाने दिलेल्या जिन्नसांचे औषधी गुणधर्म थेट वापरून आजारांवर उपाय करतात. (Teeth Pain Relief)
यामुळे अस्सल आणि प्रभावी गुणधर्मयुक्त औषधींसोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे हि औषध माहित असलेली नेहमीच उत्तम. निसर्गातील अनेक वनस्पतींच्या वापराने दातदुखी कमी करता येते. यापैकी काही तर आपल्या रोजच्या वापरातील आहेत. जसे कि, लिंबू, लवंग, मोहरी, काळे मिरे इत्यादी. चला तर त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया:-
1. कांदा –
दुखणाऱ्या दातावर वा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवा. यामुळेदेखील दातदुखी कमी होते.
2. बटाटा –
दात दुखीसोबत हिरडीवर सूज चढलेली असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या कराव्या आणि दुखत असलेल्या भागावर १५ मिनिटांपर्यंत ठेवाव्यात. यामुळे दातदुखीपासून आराम मिळतोच आणि सूजदेखील उतरते. (Teeth Pain Relief)
3. लिंबू –
लिंबामध्ये व्हिटामिन सी असते. त्यामुळे दातदुखीसाठी लिंबू मदत करते. यासाठी जो दात दुखत आहे तिथे लिंबाच्या चकत्या ठेवा. यामुळे लवकर आराम मिळतो.
4. बर्फ –
दुखणाऱ्या दाताच्या भागावर साधारण १५ ते २० मिनिटांपर्यंत बर्फाचा तुकडा लावावा. यामुळे नसा सुन्न होऊन अनेकदा हिरड्यांवरील सूज उतरते आणि दातदुखीपासून अराम मिळतो. (Teeth Pain Relief)
5. मोहरीचे तेल –
साधारण ३ – ४ थेंब मोहरीचे तेल घ्या आणि या तेलामध्ये एक चिमूटभर मीठ टाका. यानंतर हे मिश्रण घेऊन हलक्या बोटाने दात आणि हिरड्यांना मसाज करा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळेल.
6. काळीमिरी पावडर –
एक चतुर्थांश चमचा मिठामध्ये फक्त एक चिमूटभर काळ्या मिरीची पावडर मिसळून दुखणाऱ्या दाताच्या भागात लावा. थोडा त्रास होईल पण नक्कीच आराम मिळेल.
7. लवंग तेल –
लवंग तेल दातदुखीवर अत्यंत प्रभावी. म्हणून लवंगेचे थोडे तेल काळ्या मिरीसोबत मिसळून कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखत्या दातावर ठेवा. याने लगेच आराम मिळेल. (Teeth Pain Relief)
8. पेपरमेंट –
पेपरमेंट अर्थात पुदिना. पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब दुखऱ्या दातावर टाका. यामुळे लवकर आराम मिळेल.
9. पेरूची पाने –
जो दात दुखत असेल तेथे पेरूची पाने ठेऊन चावा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळेल. याशिवाय १ कप पाण्यात पेरूची पाने चांगली उकळून घ्या आणि या पाण्याला माऊथवॉशप्रमाणे वापरा. यामुळेही आराम मिळेल.
10. तेजपत्ता –
तेजपत्ता एक प्राकृतिक वेदनानाशक उपाय आहे. यामुळे दुखण्यापासून त्वरित आराम मिळवायचा असेल तर तेजपत्ता गुणकारी आहे. तेजपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे दातांमधील कीड आणि दुर्गंधी दूर करते. यासाठी तेजपत्ताची पावडर दुखतंय दाताच्या भागावर १० मिनिटे लावून ठेवा नंतर चूळ भरा. याशिवाय तेजपट्ट्याची ४-५ पाने टाकून पाणी उकळून घ्या आणि या पाण्याने गुळण्या करा. (Teeth Pain Relief)
० दातदुखीचा प्रतिबंध कसा करावा..?
1) निरोगी राहा आणि नियमित व्यायाम करा.
2) चांगल्या आणि उत्तम आरोग्यविषयक सवयी आत्मसाद करा.
3) दररोजच्या जीवनात हीनारी दगदग नियंत्रित करा.
4) डोक्यावर भार घेणे टाळा. म्हणजेच मेंदूवर ताण तणाव येणार नाही याची काळजी घ्या.
5) जंक फूड, अल्कहोल, स्मोकिंगसारख्या सवयींना दूर करा.
6) चांगली झोप येण्यासाठी प्रयत्न करा. योगाभ्यास आणि मेडिटेशन करा.
7) नेहमी तोंड स्वच्छ राहील याची काळजी घ्या.
8) दात चावणे किंवा कडक पदार्थ खाणे प्रामुख्याने टाळा.
9) अति गरम आणि अति थंड पदार्थांचे सेवन करू नका.
10) दातांसाठी मऊ ब्रशचा वापर करा. (Teeth Pain Relief)
‘हे’ पण वाचा :-
Teeth Pain – भाग 1: अचानक होणाऱ्या दातदुखीची असू शकतात ‘हि’ कारणे; लगेच जाणून घ्या
थंडीमुळे दातखिळी बसली? तर गरमागरम कॉफी ‘या’ पदार्थांसह बनवा आणि फील करा हॉट हॉट; जाणून घ्या
दातांची चमक हरवली आहे? मग हे घरगुती उपाय वापरून पहाच; जाणून घ्या
आयुर्वेदातही दह्याच्या ताकाचे विशेष महत्व आहे; का? ते जाणून घ्या