The effects of pneumonia on children due to air pollution

हवेतील प्रदूषणामुळे होणाऱ्या न्यूमोनियाचा लहान मुलांवर होणारे परिणाम

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  दिवसेंदिवस हवेतील प्रदूषण हे वाढतच चालले आहे , त्यामुळे वातावरणातील तापमान हे वाढत चालले आहे. वातावरणातील तापमानामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे वातावरणातील हवेचे प्रदूषण कमी करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. वातावरणात जर प्रदूषण वाढले तर मात्र फुफुसांचा आजार वाढण्यास सुरुवात होते तसेच दमा , श्वास घेण्याचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम हा जास्त प्रमाणात हा होतो.

लहान मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमाण यंदा ३० टक्क्यांनी वाढले आहे. न्यूमोनियाचा त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण हवेतील प्रदूषण हे आहे. कोरोनाच्या उद्रेकात आता लहान मुलांमधील न्यूमोनिया हे नव्याने आलेले आव्हान आहे, असे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यंदा ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांना न्यूमोनियाचा धोका सर्वाधिक आहे.न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणे असली तरीही मुख्यतः विषाणूजन्य संसर्ग आणि आणि जंतूसंसर्गातून हा होता. हा आजार मुख्यतः हवेतून पसरला
जातो.

न्यूमोनियाचा त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण हवेतील प्रदूषण आहे. हिवाळ्यात लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका असतो; पण यंदा वय वर्षे ५ ते १० मधील मुला-मुलींमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांना न्यूमोनियाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे यावर्षी न्यूमोनियाचे गांभीर्य वाढले आहे. हवेतील प्रदूषण हे त्याचे मुख्य कारण आहे . हवेतील अभिसरण क्रियेमुळे त्याचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. हिवाळ्याच्या दिवसांत हवेतील घटक हे वाढत जातात, त्यामुळे हे घटक हे जमिनीलगत च्या भागांवर तरंगत असतात त्यामुळे ते घटक श्वासामार्गे शरीरात जातात आणि त्यामुळे लहान मुलांना न्यूमोनिया जास्त प्रमाणात होतो त्याचे प्रमाण हे भारतात जास्त आहे , कारण भारतामध्ये प्रदूषणाचे प्रमाण हे जास्त असते. यामुळे मुलांच्या आरोग्याला खूप जास्त धोका हा आहे.

लहान मुलांमधील न्यूमोनिया ची कारणे

– — कुपोषण

—- पहिल्या सहा महिन्यांत स्तनपान न होणे

— कमी वजन आणि लसीकरणाचा अभाव