Coffee
| | |

झोपण्यापूर्वी कॉफी पिण्याची सवय शरीरासाठी घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता थंडी म्हटली कि एकतर गरमागरम आल्याचा चहा नाहीतर मस्त उफाळलेली कॉफी हवीच असे वाटते. त्यामुळे एकतर थंडी पळून जाते आणि शरीर काहीवेळ का होईना उबदार होते. बहुतेक लोक आजकाल चहाऐवजी कॉफीच्या पर्यायाला जास्त आवडीने निवडताना दिसतात. त्यात घसा खवखवत असेल, थोडा कफ असेल तर घशाला आराम मिळण्यासाठी रात्रीच्या वेळी हमखास कॉफी प्यायला प्राधान्य दिले जाते. अनेकांना तर जेवण झाल्यावर आणि झोपायच्या आधी कॉफी लागतेच. अगदी नातेवाईकांच्या घरी गेल्यावर देखील हे लोक कॉफी पिण्याचा अट्टाहास सोडत नाहीत. पण मित्रानो एखाद्या पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते हे तुम्हाला केव्हा कळणार? तुमची झोप उडवणारी कॉफी झोपताना प्यायल्याने कायमची झोप उडण्याची शक्यता वाढते. कारण यामध्ये कॅफेनची मात्रा जास्त असते. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यावर, झोपण्याच्या आधी कोणत्याही कारणाने अशाप्रकारे कॉफी पिऊ नका. मुळात जेवणात पुरेसा संतुलित आहार घ्या म्हणजे रात्री कॉफीची आवश्यकता भासणार नाही. जाणून घ्या दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

> रात्री झोपताना कॉफी प्यायल्याने एकदम एनर्जेटीक वाटते. परिणामी झोप उडते. हळूहळू याची सवय होऊन निद्रानाशाची समस्या वाढते.

> कोणत्याही खाण्यानंतर कॅफेन शरीरात गेले तर आपल्या शरीरातील रक्तात लोह आणि कॅल्शियम शोषले जाण्याची प्रक्रिया बंद होते. परिणामी आरोग्याच्या गंभीर तक्रारी जाणवू शकतात.

कॉफी

> कॉफीमध्ये १ चमचा साखर असणे म्हणजे २० ग्रॅम कॅलरी शरीरात जाणे. साधारणपणे कॉफीत २ चमचे साखर घालतात. म्हणजेच ४० ग्रॅम कॅलरीज आपण एकावेळी घेतो. असे रात्रीच्या जेवणानंतर इतक्या कॅलरीजची आवश्यकता शरीराला नसतानाही आपण घेतो. याचे परिणाम कालांतराने अनावश्यक जमा होणाऱ्या कॅलरीजच्या माध्यमातून दिसतात.

> कॉफी एनर्जी ड्रिंक आहे म्हणून २ जेवणांच्या मध्ये घ्या. पण जेवण झाल्यावर त्याचे सेवन टाळा. कारण सकाळच्या नाश्त्यानंतर कॉफी हमखास घेतली जाते. खरंतर ती घेताना मध्ये किमान एक ते दीड तासाचा अवधी जाणे गरजेचे असते.

> संपूर्ण दिवसातून केवळ दीड ते दोन कप चहा वा कॉफी प्या. मात्र कोणतेही जेवण झाल्यावर या कॅफेनयुक्त पेयांचे सेवन करु नका. 

> जेवणानंतर कॉफी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो. 

> दुध घातल्याने कॉफीतील टॅनिनचे प्रमाण कमी होते. मात्र आजकाल ब्लॅक कॉफी पिण्याचे वेगळेच फॅड आहे. या ब्लॅक कॉफीमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते. जे शरीरासाठी घातक आहे.