asafoetida.

हिंगाचे आरोग्यवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरातील स्वयंपाकामधे वापरत असलेल्या हिंगामुळे आपल्या घरातील स्वयंपाकाला चव येते. अन्नाला चव आणि सुगंध लाभण्यासाठी आपल्या आहारात हिंगाचा वापर केला जातो. आपल्या आहारात इतर मसाल्यांचा वापर हा खण्यासाठी केला जातो . पण हिंगाचा सुद्धा तेवढाच प्रभावीपणे वापर केला जातो. हिंगामुळे अनेक प्रकारचे रोग दूर होण्यास मदत होते. हिंग हे आहारासाठीच वापरले जाते असे नाही तीर त्याचा वापर आरोग्याच्या इतर समस्या सुद्धा दूर करण्यासाठी वापरल्या जातात.

—- दात दुखीसाठी प्रभावी

आपण आपल्या दातांसाठी ब्रश आणि टूथपेस्ट हि वापरतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचा किंवा राखेचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी वापरला जात असे. पण अनेक वेगवेगळ्या कारणाने आपल्या दातांना कीड लागून दात हे खराब झालेले दिसून येतात. अश्या वेळी दातदुखीला जास्त सामोरे जावे लागते. ज्यावेळी दात दुखी प्रचंड प्रमाणात सुरु असेल अश्या वेळी आपल्या दातांसाठी हिंगाचा वापर हा केला जातो. तसेच हिंगात अँटी ऑक्सीडेंटचे गुणधर्म आढळतात, जे दाताच्या दुखण्यासाठी आणि संसर्गाला दूर करण्यात मदत करतात.या साठी हिंगाला पाण्यात घालून उकळवून घ्या आणि त्या पाण्याने गुळणे करा. काही वेळात तुमच्या दात दुखीलाआराम मिळायला मदत होईल.

—— कानाचा सुरु झालेला त्रास दूर करू शकता .

बऱ्याच वेळा आपल्याला कानाचे दुखणे अचानक सुरु होते . कानाचे दुखणे हे जर जास्त प्रमाणात असेल तर अश्या वेळी कानात काही प्रमाणात ड्रॉप घातले जातात. त्याऐवजी जर आपल्या कानात आपण हिंगाचे पाणी टाकले तर त्याचा आपल्या कानाला खूप फायदा होतो. एका भांड्यात दोन चमचे नारळाचं तेल गरम करायचे आहे.त्यामध्ये चिमूटभर हळद घालून मंद आचेवर गरम करायचे आहे. कोमट झाल्यावर थोडंसं कानात घाला.

—- पोटदुखी आणि गॅस साठी प्रभावी

लोकांना पोटदुखी आणि गॅसच्या समस्या या निर्माण होत असतील तर अश्या वेळी आपल्या आहारात हिंगाचा समावेश हा केला जावा. पोदुखीला अराम मिळण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे हिंग होय. त्यामुळे डोकेदुखीच्या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. डोक्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज दूर होण्यासाठी सुद्धा हिंग हे काम करते.

—– सर्दी-पडसं मध्ये प्रभावी

healthआजूबाजूच्या हवामानामुळे अनेक वेळा डोकेदुखी , सर्दी , खोकला याचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होऊ शकते. अश्या वेळी आपल्या आहारात हिंगाचा वापर केल्याने सर्दी च्या आणि डोकेदुखीच्या समस्या या दूर होण्यास मदत होते . ज्यावेळी रक्तदाबाच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होत असतील तर अश्या वेळी हिंग खाण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.