शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये खारकेचे असलेले महत्व
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात जर योग्य प्रकारच्या फळाचा आणि पदार्थांचा आहारात समावेश असेल तर ते आपल्यासाठी फार लाभकारी आहे. आपल्या आहारात सुक्या मेवा यांचा जास्त समावेश त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी दररोज चे खाणे हे योग्य वेळेत असले पाहिजे . त्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवणार नाही. आपण कधीतरी खात असलेल्या खारकेचे आहारात काय महत्व आहे ते जाणून घेऊया ….
आपल्याकडे ज्या प्रकारची खारीक मिळाली जाते. ती खारीक हि पूर्णतः सुकवलेली असते. त्यामुळे जवळपास वर्षभर कोणत्याही ऋतूंमध्ये हे फळ सहजरित्या उपलब्ध असते. त्यामुळे या फळाचा वापर हा जास्त प्रमाणात केला जावा. लहान मुलांच्या आहारात याचा वापर हा उगळून केला जातो. दुधामध्ये उगळून या फळाचा वापर केला जातो. ज्यावेळी आपल्याला सर्दी किंवा ताप असेल तर त्यावेळी या फळाचा वापर हा नियमित पणे दुधासोबत केला जावा . या फळाचा वापराने ऍनिमिया सारखा आजार दूर होण्यास मदत होते तसेच आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण हे वाढण्यास मदत होते . खारकेमुळे आपल्या हाडांना सुद्धा खूप फायदा होतो. आपली हाडे बळकट होण्यासाठी खारीक लाभकारक आहे.
अशक्तपणा आणि सांधेदुखीच्या समस्या जास्त प्रमाणात असतील तर त्यावेळी आहारात खारकेचा वापर हा केला जावा. अनेकांना भूक जास्त लागत नाही . भूक लागली असली तरी काही खाण्याची इच्छा हि अजिबात निर्माण होत नाही अश्या वेळी खारीक आहारात ठेवली जावी. जर भूक वाढत नसेल तर त्या वेळी आहारात खारकेचा वापर हा पूड म्हणून केला जावा. तसेच त्याच्यामध्ये काही प्रमाणात केशर आणि साखर टाकून त्याचा वापर हा आहारात केला जावा .