आहारात तांदळाच्या पेजेचे असलेले महत्व
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या घरात दररोज काहींना काही प्रमाणात तांदूळ हा शिजवला जातो. जोपर्यंत भात हा खाल्ला जात नाही तोपर्यंत आपले जेवण पूर्ण झाले असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे दररोज काहींना काही प्रमाणात भात हा बनलाच जातो. पण भात शिजवताना तयार झालेल्या तांदळाची पेज काही वेळा बाहेर फेकून दिली जाते. ते अजिबात योग्य नाही. तांदूळ हा आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. तांदळाच्या पेजेचे फायदे कोणते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …
— तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.
— तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.
— तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताचि कमतरता दूर होते.
— तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
—- तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
— केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात,
— तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.
— तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुधारते.
— भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.
— संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात आलेली कमजोरि दूर होते.
— उच्च रक्तदाब कमी होतो. तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.
— लहान मुलांच्या आहारात तांदळाच्या पेजेचा वापर केला जावा.