The importance of roasted garlic in the diet
|

भाजलेल्या लसणाचे आहारात असलेले महत्व

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । आपल्या प्रत्येकाच्या घरात लसणाचा वापर हा स्वयंपाकासाठी केला जातो. लसणाच्या वापराने भाजीला खूप छान सुगंध आणि चव येते. त्याच्या चवीत झालेल्या बदलामुळं आपल्या ला जेवण हे जास्त जाते. त्यामुळे आहारात लसणाचा वापर हा जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे.

लसूण हा लठ्ठपणा असो, मधुमेह असो, किंवा सांधेदुखी असो, या सर्वच समस्यांसाठी लसुणाचे सेवन उपयुक्त आहे. त्याशिवाय इतर अनेक आजारांपासूनही, लसूण नियमित सेवन केल्याने बचाव होऊ शकतो. लसूण कच्चा खाल्ला जाऊ शकतो, किंवा नेहमीप्रमाणे भाजीच्या फोडणीमध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते. लसूण भाजून किंवा तळून खाल्ला तर तो आपल्या शरीराला लाभकारी आहे.

भाजलेल्या लसुणाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते. कोलेस्ट्रॉल चे प्रमाण योग्य राहण्यास लसूण हा जास्त फायदेशीर आहे. भाजलेल्या लसणामध्ये काही प्रमाणात गुड कॅलरीज असतात. आणि शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रेलचे चे प्रमाण हे कमी कमी होत जाते. छोट्या छोट्या व्याधीपासू दूर राहण्यास लसूण मदत करते. भाजलेल्या लसूण हा आपली हाडे बळकट करण्यास मदत करते. प्रौढत्वाच्या खुणा या कमी करण्यास मदत करते.