फिटनेस | बातम्या | लाईफ स्टाईल | सौंदर्य
मुलींपेक्षा मुलांमध्ये त्वचेच्या समस्यांचे प्रमाण जास्त; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल प्रत्येकामध्ये त्वचेसंबंधित आजार आढळून येत आहेत. आधी एक समज होता कि केवळ महिलांमध्येच त्वचेच्या समस्या दिसून येतात. परंतु या अयोग्य समजाचे सध्या खंडन होताना दिसत आहे. कारण सद्यपरिस्थिती पाहता स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये त्वचेच्या समस्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यामुळे आजकाल पुरुषही आपल्या त्वचेकडे अधिक लक्ष देताना दिसत आहेत.
पुरुष आणि महिलांमधील त्वचेचे आजार हे वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतात. तसे पाहता पिंपल्स येणे किंवा स्किन ऑईली होणे हा त्रास अगदी सर्वांमध्ये आढळतो आहे. पण यातही पुरुषांचा आकडेच मोठ्ठा आहे. याकरिता आम्ही आज तुम्हाला धावपळीच्या आयुष्यात करावयाचे काही सोप्पे उपाय सांगणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही या समस्यांवर मात करू शकता.
- ऑयली स्किन – महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांना ऑयली स्किनचा त्रास जास्त असतो. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सीबम देखील खूप जास्त येतात. पुरुषांमधील हार्मोन असंतुलित असल्यामुळे स्किन ऑयली होते. त्यामुळे ऍक्ने किंवा पिंपल्सच्या समस्या उदभवतात. याकरिता ऑयली स्किनचा त्रास असणाऱ्या पुरुषांनी
– वॉटर बेस्ट मॉइश्चसायझर वापरले पाहिजे.
– दिवसातून कमीत कमी २ वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायला हवा. शिवाय आहारामध्ये तेलकट पदार्थ वर्ज्य केले पाहिजे. - ड्राय स्किन – काही पुरुषांना ड्राय स्किनचा त्रास असतो. हा त्रास वातावरणातील बदल, धूळ आणि कामाचे टेंशन यांमुळे निर्माण होतो. ड्राय स्किनमुळे जळजळ होणे, त्वचा सोलपटणे, त्वचा खेचल्यासारखे वाटणे, खाज येणे असे त्रास होतात. यामुळे कधीकधी त्वचेवर तडेदेखील जातात. यासाठी मुलांनी
– ऑईल बेस्ट मोइश्चरायझर वापरावे.
– शिवाय हर्बल फेसवॉश वापरल्यास फायदा मिळू शकतो.
– दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे. - पिंपल्स प्रॉब्लेम – काही मुलांमध्ये वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते. पिंपल्स आपल्या शरीरातील बदलामुळे येतात. त्यात जर मानसिक तणाव, अतिरिक्त घाम येत असेल तरीही पिंपल्सची समस्या येते. पुरुषांना घाम येण्याचं प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त असतं.
– चेहऱ्यावर बर्फ लावावा
– खुप जास्त पिंपल्स येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डार्क सर्कल – टेंशन, अपूरी झोप, जंक फूड यामुळे ‘डार्क सर्कल’ होण्याची समस्या बळावते. या समस्येवर उपाय म्हणून मुलांनी
– नाईट अंडर आय क्रिम वापरावे.
– शक्य असल्यास चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फेस पॅकचा वापर करावा.
– विटामिन ई कैप्सूलचाही वापर करू शकता.