एक तासाचा जिम वर्कआऊट करण्यापेक्षा ‘हा’ करा उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला संतुलित ठेवण्यासाठी आपल्या दररोज च्या दिनक्रमातून काही वेळ हा व्यायाम आणि शरीराची हालचाल करण्याकडे दिला गेला पाहिजे. व्यायाम करताना नेहमी सकाळ किंवा संध्याकाळ चा वेळ काढला गेला पाहिजे. त्यावेळी आजूबाजूचे वातावरण हे शांत आणि थंड असते . सकाळच्या वेळेत हवा हि फ्रेश असते . त्यासाठी काही वेळ जिम मध्ये जाऊन किंवा कोणत्याही फ्रेश ठिकाणी जाऊन व्यायाम हा करू शकता. शरीराला जसे अन्न आणि पाण्याची गरज आहे . त्याच पद्धतीने शरीरं निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे .
आजकाल व्यायाम करण्यासाठी जास्त करून जिम चा वापर केला जातो. जिम च्या वापरापेक्षा आपण ग्राउंड किंवा डोंगर टेकडी तसेच कोणतेही नैसर्गिक ठिकाण याचा वापर केला तर ते शरीरासाठी योग्य आणि भारी आहे . जिम हि एक फॅशन झाली आहे . त्यामुळे सर्रास लोक हे जिम मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. पण जिम मध्ये जाण्यापेक्षा आपण बाहेरच्या सुदंर वातावरणात आणि स्वच्छ वातावरणात जर व्यायाम केला तर शरीराला खूप फायदेशीर असणार आहे. त्यासाठी जिमच्या साहित्याचा वापर करावा असे काही नाही . तुम्ही आपल्याला वेळ असेल अश्या वेळी पायऱ्या चढण्याचा व्यायाम केला तरी तो व्यायाम हा इतर व्यायामांपेक्षा किती तरी पटीने अधिक भारी असा आहे.
अनेक वेळा केलेल्या अभ्यासानुसार आणि त्याच्या निष्कर्षातून असे सामोर आले आहे कि , जिममध्ये एक तास व्यायाम करून जेवढ्या जास्त प्रमाणात घाम निघतो. त्याहून जास्त घाम हा १५ मिनिटे पायऱ्या चढून निघतो . काही प्रमाणत जरी पायऱ्या चढण्या आणि उतरण्याचा व्यायाम केला तर त्याचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो. आपल्या शरीरातील मांस पेशी कमी करण्यासाठी तुमच्या शरीराला काही प्रमाणात वर्क आऊट चा वापर हा करू शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त लांब पण जाण्याची गरज नाही .