दातांचा पिवळेपणा दूर करायचा आहे; ‘हि’ आहेत पिवळ्या दातांची कारणे आणि त्यावरील उपाय (उत्तरार्ध)
हॅलो आरोग्य ऑनलाईन: पूर्वार्धात आपण दात पिवळे होण्या पाठीमागची कारणे पाहिली. आता आपण जाणून घेऊयात कि घरगुती उपायांनी दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल ते पाहुयात.
घरच्या घरी असा घालवा दातांचा पिवळेपणा (Teeth Whitening at Home in Marathi)
केळ्याच्या साली (Banana Peel)
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. ते ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची सालं उपयोगी पडते. केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल तुम्ही तुमच्या दातांना घासा. असे केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. वर म्हटल्याप्रमाणे सालीमध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करते. केळ्यांच्या सालीचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनवेळा केला तरी चालू शकेल. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
स्ट्रॉबेरी (Strawberry)
ज्या प्रमाणे केळ्याच्या सालीमध्ये अॅसिडीक गुणधर्म असतात अगदी त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीमध्येही काही अॅसिडीक गुणधर्म असतात. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड आणि टूथ व्हाईटनिंग एजंट आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा उपयोगही दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केला जातो. स्ट्रॉबेरी हाताने क्रश करुन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालून एक छोटा ब्रश घेऊन टुथपेस्टचा वापर करतात अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे दात घासायचे आहेत. असे करताना तुम्हाला थोडी चुरचूर जाणवेल. पण जर तुम्हाला जास्त अॅसिडीक रिअॅक्शन नको असेल तर तुम्ही यातील सोडा वगळू शकता आणि नुसताच स्ट्रॉबेरीचा क्रश वापरु शकता.
लिंबाची फोड आणि खाण्याचा सोडा (Lemon Slice and Soda)
लिंबू ही ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे ते तुमच्या त्वचेवर काम करते अगदी त्याच पद्धतीने ते तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करु शकते. लिंबामध्ये सायट्रिक असते. ज्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे एक लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा घाला आणि ही फोड दातावर चोळा आणि अगदी काहीच वेळ ठेवून तुम्ही गुळण्या करा. (लिंबाचा अति वापर तुमच्यासाठी चांगला नाही. लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड तुमच्या दातांसाठी चांगले नाही. त्याच्या अति वापरामुळे तुमच्या दातांवरील इनॅमल कमी होते आणि त्यामुळे तुमचे दात नाजूक होतात. जे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा वापर अगदी योग्य व्हायला हवा)
अँपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अँपल सायडर व्हिनेगरचा वापर देखील केला जातो. अँपल सायडर व्हिनेगरमधील ऍसिडिक घटक तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करतात. अँपल सायडर व्हिनेगर तुमच्या दातांसाठी जितके चांगले आहे तितकेच ते वाईट आहे. अँपल सायडर व्हिनेगर तुम्ही थेट तुमच्या दातांना लावू शकत नाही. अगदी किंचिंतसे व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घाला. कापसाचा बोळा किंवा थेट बोटाने तुम्ही तुमच्या दातांवर व्हिनेगर चोळा. एका मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही ते ठेवू नका. नाहीतर दातांवरील आवश्यक इनॅमल निघून जाईल.
बेकिंग सोडा आणि ब्रश (Baking Soda and Brush)
आतापर्यंत आपण पाहिलेच आहे की, बेकिंग सोडाचा वापर दातांसाठी केला जातो. तुम्ही थेट बेकिंग सोड्याचा वापर दातांसाठी करु शकता. बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या थेट दातांवर करा. तुमच्या दातांचे डाग निघून जातील. बेकिंग सोड्याचा वापर करताना थोडे जपून राहा.
अननस (Pineapple)
दातांचा पिवळेपणा तुमच्या दातांमध्ये साचलेल्या प्लाकमुळे अधिक दिसू लागतो. तुमच्या दातांच्या आजुबाजूला जर पिवळा थर साचला असेल तर त्याला प्लाक असे म्हणतात. अननसामध्ये असलेले इन्झाईम्स तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करतात. अननसाची फोड घेऊन तुम्ही तुमच्या दातांवर चोळा. यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा कमी झालेला दिसेल. याशिवाय तुमच्या दातांवरील प्लाक निघण्यासही तुम्हाला मदत मिळेल.
कडुनिंब (Neem)
तुमच्या दातांच्या समस्या कमी करण्यासाठी कडुनिंब हे उत्तम आहे. कडुनिंबामुळे तुमच्या दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. हल्ली बाजारात कडुनिंबाची पावडर मिळते. तुम्ही कडुनिंबाची पावडर घेऊन तुमचे दात ब्रश करु शकता. तुमच्या दातांचा रगं उजळण्यासोबतच तुमच्या दातांच्या इतर समस्याही त्यामुळे दूर होतील. कडुनिंबाचा वापर करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
कोळसा (Coal)
कोळश्याचा उपयोग दातांची स्वच्छता करण्यासाठी केला जातो हे तुम्ही पाहिले असेलच. कोळसा तुमच्यातील दातांवरील काळेपणा दूर करण्यास मदत करते. कोणतीही इम्प्युरीटी कोळसा काढून टाकण्यास मदत करते. पण हा शास्त्रशुद्ध उपाय नाही. कारण असे अजिबात सिद्ध झालेले नाही. जर तुम्ही कोळशाचा वापर करत असाल तर त्याचे नुकसानही तुम्हाला होणार नाही. त्यामुळे बाजारात मिळणारी अॅक्टिव्ह चारकोल पावडर घेऊन तुम्ही ती तुमच्या दाताला चोळू शकता. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील.
काळे मनुके (Raisins)
काळे मनुके तुमचे दात स्वच्छ करण्यास मदत करते. जर तुम्ही काळे मनुके चघळले तर या मनुक्यांमधून बाहेर पडणारे अॅसिडीक गुणधर्म तुमच्या दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात.त्यामुळे तुम्ही काळे मनुके अगद मूठभर खायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर मनुके खाणार असाल तर तुम्ही ते उघडून ते तुमच्या दातांनाही चोळू शकता. त्यामुळे तुमच्या दातांच्या इतर समस्याही कमी होतील.
संत्र्याच्या साली (Orange Peel)
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालींचा देखील उपयोग करु शकता. संत्र्यांच्या सालीमध्ये सायट्रीक ऍसिड असते.त्याचा उपयोग तुम्हाला दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी होऊ शकतो. जर तुम्ही संत्र्याची पावडर तयार करुन ठेवली तर तुम्ही त्याचा उपयोग आठवड्यातून दोनदा करु शकता. तुम्ही तुमच्या ब्रश करण्याच्यावेळी त्याचा वापर केला तरी चालू शकेल. पण सायट्रीक ऍसिड असल्यामुळे त्याचा वापर थोडा बेताने करा.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करणे घातक आहे का?
कोणत्याही गोष्टींचा वापर तुमच्या दातांसाठी करताना तुम्हाला थोडा विचार करणे आवश्यक असते. तुम्ही दातांसाठी ब्लीच असलेले पदार्थ वापरत असाल तर त्याचा अतिरेक करायला नको. कारण जर तुम्ही अशा गोष्टींचा वापर जास्त करत असाल तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: नैसर्गिक ऍसिड असलेले पदार्थ अति वापरल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी डेंटिस्ट नेमके काय करतात?
जर तुम्ही तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट अशी ट्रिटमेंट केली जाते ती म्हणजे ब्लीच ट्रिटमेंट. या ट्रिटमेंटमध्ये तुमच्या दातांना ब्लीच लावले जाते. त्यानंतर त्यावर ब्लु लाईट दिली जाते. अनेक सेलिब्रिटी अशा प्रकारच्या ट्रिटमेंट घेतात. कारण त्यांना स्क्रिनवर चांगले दिसायचे असते. ही ट्रिटमेंट साधारण वर्षभर टिकते. जर तुम्ही कॉफी किंवा चहाचे सेवन बेताने केले तर तुमच्या दातांचा पांढरेपणा अधिक काळ टिकून राहतो.
दात पिवळे होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही दिवसातून किती वेळा चहा -कॉफी प्यायला हवी?
चहा आणि कॉफीच्या अति सेवनामुळेही तुमचे दात पिवळे होतात. जर तुम्ही तुमच्या दातांसाठी ब्लीच ट्रिटमेंट घेतली असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात. तुम्ही कोणतीही ट्रिटमेंट घेतली नसेल तरी तुम्ही चहा-कॉफीचे प्रमाण हे योग्य ठेवायचे असते. कारण सतत चहा कॉफी किंवा कोल्ड्रींक्सच्या सेवनामुळेही तुमचे दात पिवळे होऊ शकतात. जर तुम्हाला चहाची तल्लफ टाळता येत नसेल तर तुम्ही दोनदाच याचे सेवन करा.आता या सोप्या उपायांना दातांचा पिवळेपणा करा दूर आणि हसा बिनधास्त