केसांच्या नैसर्गिक मजबुतीसाठी ‘हि’ पोषक तत्त्वे महत्वाची; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। केस जर मुळापासून मजबूत असतील तर केसगळतीच्या समस्येचा त्रास होण्याचा सवालच येत नाही. पण केस मुळापासून मजबूत होण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स किंवा केमिकल ट्रीटमेंट्सचा वापर करू नये. अन्यथा केसांचे नुकसान निश्चित आहे. मग केसांच्या मजबुतीसाठी काय करायचे असा एक साधा सरळ प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो प्रश्न फार साहजिक आहे. तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे. केसांची सुंदरतादेखील आहारावर अवलंबून असते. त्यामुळे तुमच्या आहारात केसांना पोषण देणारे घटक असणे गरजेचे आहे. तर हे घटक किंवा हि पोषण तत्त्वे कोणती…? तर ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल भरपूर प्रमाणात असते असे पदार्थ दिवसभरातून किमान एकदा खाणे आवश्यक आहे. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.
केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस दिवसेंदिवस पातळ होणे, अकाली केस पांढरे होणे, अकाली टक्कल पडणे यांसारख्या समस्यांवर मात करायची असेल तर, आपल्याला केसांच्या मजबुतीसाठी नेमके कोण कोणते पोषक तत्व आपल्याला आहारामध्ये असावे हे आपण आज जाणून घेणार आहोत. खालीलप्रमाणे:-
० व्हिटॅमिन ए –
व्हिटॅमिन ए मुळे केसांना मॉइस्चराइज होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपल्या केसांची वाढ वेगाने होते.
रताळे, भोपळा यांसारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए ची मात्रा जास्त असते.
० व्हिटॅमिन बी –
व्हिटॅमिन बी मुळे स्कॅल्पपर्यंत ऑक्सिजन आणि अन्य पोषक तत्वांचा पुरवठा व्यवस्थित होतो. शिवाय यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होते.
केळी, कडधान्य, अन्य डाळी इ. पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी ची मात्रा जास्त असते.
० व्हिटॅमिन सी –
शरीरात कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी गरजेचे असते. या तत्त्वामुळे केस निरोगी आणि मजबूत राहतात.
द्राक्षे, आवळा, संत्री, मोसंबी यांसारख्या आंबट वर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते.
० व्हिटॅमिन ई –
व्हिटॅमिन ई ऑक्सीडेंटिव तणाव रोखते. या पोषक तत्वांमुळे आपले केस गळत नाहीत.
बदाम, पालक, कंदमुळे इ. पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते.
० प्रोटीन –
आपल्या आहारात प्रोटीनची मात्र व्यवस्थित असेल तर केसांचे आरोग्य निरोगी राखायला मदत होते.
दूध, दही, डेअरी प्रोडक्ट, अंडी, मासे यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन अधिक असते.
० आयर्न –
आयर्न म्हणजेच लोह. शरीरात लोह कमी असल्यास अशक्तपणा येतो. तसेच रक्ताच्या कमतरतेमुळे केसांचे आरोग्य देखील बिघडते. त्यामुळे केसांना मुळापासून मजबूत बनवायचे असेल तर आहारात लोहयुक्त पदार्थ असायला हवेत.
फळे, कडधान्य, बीट, गाजर यांसारख्या पदार्थांमध्ये आयर्न अर्थात लोहाची मात्रा अधिक असते.
० बायोटिन –
बायोटिन शरीरातील केराटिन निर्मितीसाठी उपयुक्त आहे. केराटिनमुळे केसांना नैसर्गिक पोषण आणि मुलायमपणा मिळतो.
अंड्याचा पिवळा बलक, रताळे आणि मशरूम इत्यादी पदार्थांमध्ये बायोटिन मोठ्या प्रमाणात आढळते.
० झिंक –
केसांच्या लांबीसाठी झिंक गरजेचे आहे. तसेच यामुळे केसातील कोडा कमी होतो आणि केसांची वाढही लवकर होते. शिवाय स्कॅल्पचे इन्फेक्शन दूर होते.
डाळ, सुका मेवा यासारख्या पदार्थांमध्ये झिंकची मात्रा जास्त असते.