या व्यक्तींनी आपल्या आहारात बदाम घेणे आहे, घातक
हॅलो आरोग्य ऑनलाईन । बदाम हा आपल्या आहारात जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या शरीराला बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांना तर त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी बदाम खाण्यास दिले जाते. बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फायदेशीर असते. लहान मुलांना देखील बदामाचं नियमित सेवन लाभदायक असतं. बदामाच्या तेलाने सुद्धा लहान मुलांच्या शरीराला मालिश केले जाते. बदामाने स्मरणशक्ती तल्लख होते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. परंतु काही व्यक्तींना बदाम खाणं फायदेशीर ठरतं तर काहींसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या आहारात बदामाचा समावेश करायला हवा की नको याची माहिती घेऊया ….
—– उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे. कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात. अशावेळी बदाम ही समस्या अधिक वाढवेल.
—– लहान मुलांना प्रमाणापेक्षा जास्त बदाम खायला दिले तर त्याच्या शरीरासाठी सुद्धा नुकसान कारक ठरू शकते.
—– ज्या लोकांना किडनी चा त्रास आहे त्या लोकांनी बदाम हा खाल्ला नाही पाहिजे.
—- मूतखडा च्या समस्या या जास्त असतील तर मात्र आपण आपल्या आहारात बदाम हा ठेवला नाही पाहिजे.
— सकाळच्या वेळेत बदाम खाणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
— ज्या लोकांना ऍसिडिटी चा त्रास जास्त आहे त्या लोकांनी बदाम आहारात ठेवू नये.
— तसेच पोटाच्या समस्या ज्या लोकांना खूप आहेत त्या लोकांनी आपल्या आहारात बदाम जास्त ठेवू नयेत.
— बदाम मध्ये फायबर्स चे प्रमाण हे जास्त असल्यामुळे तुमच्या शरीराला कधी कधी अपायकारक ठरू शकते बदाम
— जे लोक बदाम खातात त्यांना वजनाचा त्रास हा जास्त प्रमाणात वाढू शकतॊ.