वयाच्या चाळिशीनंतर पुरुषांसाठी ‘या’ चाचण्या आवश्यक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। वयाची चाळीशी हे असं वय आहे जेव्हा माणूस उत्तर व्हायला लागतो. सर्वसाधारणपणे या वयापासून तब्येतीच्या तक्रारींमध्ये वाढ होते. मुख्य म्हणजे पुरुषांमध्ये अनेको आजार असे पाहायला मिळतात ज्यांची लक्षणे बहुतेकदा समजून येत नाहीत. त्यामुळे या आजारांचे निदान होण्यासाठी बराच काळ निघून जातो आणि तोपर्यंत हे आजार गंभीर स्वरूपाचे झालेले असतात. यासाठी योग्य वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
बहुतेकदा कामाचा अतिरिक्त ताण, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अपुरी झोप हि करणे अनेको आजारांची कारणे असतात. यामुळे वयाच्या साठीमध्ये होणारे आजार ३० – ४० व्या वयातच होऊ लागतात. यापैकी जास्तीत जास्त आजाराचे प्रमाण पुरुषांमध्ये पाहायला मिळते. यासाठी पुरुषांनी वयाची चाळीशी ओलांडली कि प्रामुख्याने खालील चाचण्या करून घेणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला या चाचण्यांविषयी काहीही माहित नसेल तर जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) मधुमेह – डॉक्टरांच्या माहितीनुसार, मधुमेहग्रस्त एक चतुर्थांश लोक वेळेवर उपचार घेत नाहीत. यामुळे अनेको आजार साहजिकच शरीराला नुकसान पोहचवतात. यासाठी दररोज साधारण ३० मिनिट व्यायाम आणि ५% वजन कमी केल्याने मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
२) कोलेस्टेरॉल – शरीरात साठलेला बॅड कोलेस्टेरॉल हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचे मुख्य कारण मानले जाते. यामुळे हृदयासंबंधी समस्या वाढतात. शिवाय उच्च रक्तदाब कमी वा जास्त असेल तर हि चाचणी करणे आवश्यक आहे. याची पहिली तपासणी वयाच्या विसाव्यावर्षी जरूर करावी.
३) बीएमआय – लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग असे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बीएमआय तपासणी नक्की करावी.
४) टेस्टिकुलर कॅन्सर – तज्ञांच्या सांगण्यानुसार, २० – ३९ वयोगटातील पुरुषांमध्ये सर्वांत सामान्य रोग म्हणजे अंडकोष कर्करोग. हा रोग वेळेत ओळखला गेला नाही तर हा आजार गंभीर समस्यांचे कारण होऊ शकतो. टेस्टिक्युलर कॅन्सरची गाठ खूप लहान असते. यासाठी आपल्याला अंडकोष तपासणी करावी लागते. म्हणूनच पुरुषांनी वर्षातून २-३ वेळा ही तपासणी करणे आवश्यक आहे.
५) त्वचेचे निरीक्षण – आपली त्वचा आपल्या बिघडत्या आरोग्याचे संकेत देत असते. यामुळे त्वचेवर कुठे तीळ आले आहेत? तीळ आले असतील तर त्यामध्ये काही बदल झाले आहेत का? तिळाचा रंग बदललाय का? तसेच त्वचेवर कुठेतरी काळे-पांढरे डाग तर आले नाही ना? त्वचेवर खड्डे वा चट्टे पडले आहेत का? हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
६) दातांची तपासणी – दाताला झालेली इजा प्रचंड वेदनादायक असते. त्यामुळे घरच्याघरी दातांची निगा राखणे गरजेचे आहे. दररोज दिवसातून २वेळा दात घासावे. महिन्यातून एकदा तरी आरशासमोर उभे राहून हिरड्यांना कीड लागली आहे का? हे तपासून घ्यावे. तसेच प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन काही चाचण्या वेळोवेळी निश्चित कराव्या.
७) एचआयव्ही – एचआयव्हीची लागण झालेल्या अनेकांना योग्य वेळी या आजाराचे निदान होत नाही. सर्वसाधारणपणे ३३% लोकांना हा आजार झाल्याचे माहीतच नसते. त्यामुळे याची तपासणी जरूर करून घ्या. तसे पाहता ही एक सामान्य रक्ततपासणी आहे. परंतु अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त डॉक्टरचा सल्ला घेत इतर चाचण्यादेखील करून घ्या. तज्ञांनुसार, पुरुषांनी दर ५ वर्षांनी हि तपासणी करणे आवश्यक आहे.