कोणत्याही संसर्गावर ‘हा’ घरगुती काढा 100% गुणकारी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणत्याही संसर्गापासून आपल्या शरीराचे रक्षण करायचे असेल तर लक्षात ठेवा कि तुमची इम्युनिटी अर्थात रोग प्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी. याचे कारण म्हणजे, आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीराचे कोणत्याही बॅक्टेरीयापासून संरक्षण करत असते. ज्यामुळे आपल्याला आजारपण स्पर्श करीत नाही. मात्र तुमची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर दर दोन दिवसाला तुम्ही आजारी पडणार हे निश्चित आहे.
अनेक लोकांना आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली तर रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहील हे माहित नसतं. यामुळे चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली आणि अगदी चुकीच्या औषधांचे सेवन केले जाते. याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आजारपण लागते. आता जर तुम्ही असा विचार करत असाल कि, इम्युनिटी बुस्टर औषधे खावी तर याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला प्राचीन आयुर्वेद पद्धतीत सांगिलेला एक अस्सल आयुर्वेदिक काढा सांगणार आहोत. जो तुमच्या शरीराची पूर्ण काळजी घेण्यास सक्षम आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही संसर्गावर अत्यंत परिणामकारक हा काढा तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्प्या पद्धतीने बनवू शकता. कसा? चला जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-
० आयुर्वेदिक काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
– ५ ते ६ तुळशीची पाने
– २ वेलची
– १ कच्च हळदकुंडं
– १ चमचा लवंग
– १ चमचा काळीमिरी
– १ दालचिनीचा तुकडा
– १ छोटा आल्याचा तुकडा
– ५ ते ७ मनुका
– १ मोठा खडी साखरेचा तुकडा (पत्री खडी साखर)
० काढा करण्याची कृती – सर्वप्रथम हळद धुवून किसून घ्या आणि आल्याचा रस काढून घ्या. आता १/२ कप हळदीचा रस आणि ५ चमचे आल्याचा रस ४ कप पाण्यात उकळवा. यानंतर हे पाणी पिवळे दिसू लागले कि,५ मिनीटांनी इतर सर्व साहित्य त्यात टाका. आता साधारण २० मिनीटे पाणी उकळवून चांगले आटून अर्धे होईपर्यंत उकळवा. यानंतर तुमचा काढा तयार. हा काढा तुम्ही दररोज पिऊ शकता. यासाठी १ कप काढ्यामध्ये १ चमचा मध मिसळा आणि कोमट असतानाच काढा प्या.
० आयुर्वेदिक काढा पिण्याचे फायदे –
१) रोग प्रतिकार शक्तीत वाढ होते.
२) रक्तपेशी सक्रिय होतात.
३) हृदय विकारापासून संरक्षण मिळते.
४) रक्त शुद्ध आणि पातळ होते.
५) पोटाचे त्रास दूर होतात.
६) मल-मूत्र विसर्जन मार्गातील अडथळे दूर होतात.
७) सर्दी, कफ, खोकला अश्या प्रत्येक संसर्गजन्य आजारांपासून सुटका मिळते.