या शिळ्या पदार्थाचा आहारात अजिबात करू नये वापर
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या आहारात जर शिळ्या पदार्थाचा समावेश असेल तर आपल्याला पोट दुखीचा समस्यांना सामोरे जायला लागू शकते. पोट दुखी हि साधारण समस्या नाही . कदाचित त्याचे सुद्धा मोठ्या आजारामध्ये रूपानंतर होऊ शकते. त्यामुळे शक्यतो ज्या लोकांना पोटदुखीच्या समस्या जास्त प्रमाणात आहेत त्या लोकांनी शिळ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ नये .
बटाटा —
आपल्या आहारात शिळा बटाटा अजिबात ठेवू नये, बटाटा शिजवल्यानंतर बराच काळ जर तो तसाच राहिला तर मात्र बटाट्यामध्ये काही प्रमाणात कोस्टीलम बोटुलिझम या बॅक्टरीयाचा जास्त फैलाव होतो. त्यामुळे हे पदार्थ खाताना काळजी घेतली पाहिजे. या आजाराची लागण झाली तर मात्र डोळ्यांना कमी दिसणे , श्वास कमी प्रमाणात घेणें अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.
पालक —
पालक ची भाजी आरोग्यासाठी महत्वाची तर आहेच. पण शिळी पालक भाजी आहारात ठेवली तर मात्र पोटच्या समस्या या जास्त निर्माण होतात. त्यामुळे पालक ची भाजी शिजवताना सुद्धा जास्त प्रमाणात शिजवली जाऊ नये.
शिळा भात —
शिळा भात हा आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात समस्या या निर्माण होऊ शकतात शिळा भात यामुळे विषबाधा हि जात प्रमाणात निर्माण होऊ शकतात.
तेलकट अन्न —
आहारात तेलकट अन्नाचा समावेश केला तर मात्र खोकला वगैरे अश्या समस्या जाणवू शकतात. तेलकट अन्न खाण्याने घसा हा पॅक होऊन जातो.