घरातील करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी …
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरात अनेक वेळा भांडी करपलेली पाहायला मिळते. भांडी करपलेली असतील तर स्वच्छ करण्यासाठी घरगुती पद्धतीच्या कोणत्या प्रकारच्या टिप्स वापरल्या गेल्या पाहिजेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवण करताना अनेक वेळी भांडी हि जास्त करपलेली असते. त्यामुळे इतर पदर्थाना सुद्धा त्याचा वास हा जास्त लागतो. त्यामुळे भांडी हि खूप खराब होतात. अश्या वेळी कशी भांडी स्वच्छ करावीत याची माहिती घेऊया …
—- नेहमी जर आपल्याकडून चुकून भांडी करपली जात असतील तर त्यावेळी भांड्यात पाणी घालून भांडी तशीच भिजत ठेवावीत. आणि हळू हळू भांडी काही प्रमाणात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा.
— कधी कधी भांड्यामधे काही प्रमाणात पाण्यात मीठ टाकून ते पाणी उकळून घ्यावे. त्याने भांडी हि लगेच स्वच्छ होतात.
— भांड्यात पाणी आणि कांद्याचे छोटे तुकडे टाकून उकळी घ्या. काही वेळातच करपलेले तुकडे निघून येतील. त्यानंतर घासणीच्या साह्याने हळू हळू भांडी स्वच्छ करा.
— भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी घेऊन ते पाणी उकळवा. भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन कप गरम पाणी टाका. मग काथ्याने भांड स्वच्छ करा.
—- करपलेल्या भांड्यात एक लिंबाची फोड टाकून ती ठेवली तर सुद्धा भांडी हि लगेच स्वच्छ होतील.
— भांड्यात अमोनिया आणि पाणी टाकून उकळवा. गरम झाल्यानंतर घासून घ्या. स्वच्छ थंड पाण्याने भांडी साफ करून घेतली तर त्याचा खूप फायदा होतो.