मास्कमुळे त्वचेला होणारा, त्रास कमी करण्यासाठी काय आहेत उपाययोजना ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । मास्क हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे . सध्या कोरोनाचा काळ हा सुरु आहे . त्यामुळे जिकडे तिकडे मास्कशिवाय फिरण्यास बंदी घातली आहे . मास्क जर असेल तर कोरोना पासून सरंक्षण होण्यास मदत होते. पण आपल्या तोंडावर जर सतत मास्क असेल तर त्यामुळे कदाचित तुम्हाला त्वचेचे विकार होण्यास सुरुवात होऊ शकते . सतत तोंडावर मास्क राहिल्याने चेहऱ्याला सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही . त्यामुळे त्वचेवर डाग, मुरूम आणि कानाच्या त्वचेवर ताण येण्यास सुरुवात होते . त्यामुळे त्वचा अजून खराब दिसण्यास सुरुवात होते .
मास्क जर सतत तोंडावर ठेवत असाल तर त्या वेळी मात्र आपला मास्क हा घरी आल्या आल्या धुवून टाका . तसेच जर त्वचेला सूर्यप्रकाश मिळत नसेल तर त्वचेवर मेलॅनिन तयार होणार नाही. त्यामुळे त्वचेचे रोग निर्माण होऊ शकतात. घरी आल्या आल्या आपला चेहरा हा क्लिन्जर च्या मदतीने स्वच्छ करा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्यावर क्रीम लावा . तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यावेळी मात्र चेहऱ्यावर मुरूम यायला सुरुवात होते . त्यामुळे योग्य अशी क्रीम आपल्या चेहऱ्यावर निवडा.
आपल्या त्वचेवर जर मुरूम येत असतील तर त्यावेळी मात्र आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट चा वापर केला जाऊ नये. आपल्या चेहऱ्यावर असलेली पोअर्स हे बंद होते. त्यामुळे अजून जास्त त्रास चेहऱ्याला होतो. आपल्या तोंडावर जर सतत मास्क असेल तर त्या वेळी मात्र आपल्या चेहऱ्याचे आणि मास्क चे घर्षण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेचे विकार हे जाणवतात. सतत मास्क वापरू नका. मास्क वापरत असताना काही वेळेचा ब्रेक घ्या . मास्क वापरताना नेहमी कापडी मास्क वापरण्याचा प्रयत्न करा.
मास्क घेत असताना नेहमी सुती कापडी मास्क घ्या . त्यामुळे ते धुताना खूप सोपा जातो. स्वच्छ राहिला जातो. सिंथेटिक किंवा नायलॉन याचा वापर केला जाऊ नये . कारण त्यामुळे आपला कानाच्या भागाला ताण येतो . कानाच्या जवळ असलेल्या शिरा या दुखायला सुरुवात होते. रबर मास्क वापरू नका . त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास हा निर्माण होतो. सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्वचा हि रफ होत जाते. चेहऱ्यावरून थोड्या फार प्रमाणात त्वचा निघते . त्याला त्वचा फुटते असेही म्हणतात. तर त्यावेळी मालिश करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी चेहरा हा सुंदर होण्यास मदत होऊ शकते .