Toilet Hygiene : निरोगी आरोग्यासाठी ‘टॉयलेट हायजिन’ महत्वाचे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Toilet Hygiene निरोगी आणि उत्तम जीवनशैलीसाठी शारीरिक स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. कारण अनेक आजारांची सुरुवात अस्वच्छ जीवनशैलीमुळेच होते. यात सगळ्यात महत्वाचे आहे ते टॉयलेट हायजिन. घरामध्ये अन्य जागेच्या तुलनेत बाथरूमध्ये सर्वाधिक जंतू आढळतात. येथे नळ, हँड ड्रायर, दरवाजाची कडी यावर सर्वात जास्त जंतू असू शकतात; जे आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत देखील नाहीत. त्यामुळे टॉयलेट हायजिन नक्कीच आरोग्यासाठी महत्वाचे आहे. म्हणूनच आज आपण टॉयलेट हायजिनविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
सार्वजनिक माहितीनुसार, टॉयलेट सीट स्वच्छ ठेवणे वा वापरल्यानंतर टॉयलेट फ्लश करणे म्हणजेच टॉयलेट हायजिन पाळणे असे आहे. पण तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, टॉयलेट फ्लश करतेवेळी संसर्ग होण्याची वा पसरण्याची जास्त शक्यता असते. याचे कारण असे कि, फ्लश करताना पाण्याचे जे प्रेशर असते त्यामुळे आजूबाजूच्या हवेत विषाणू सहज मिसळले जाऊ शकतात. यामुळे स्वच्छ आणि चमकदार टॉयलेटमध्येसुद्धा असंख्य जिवाणूंचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Toilet Hygiene
आता घरातील स्वच्छ वॉशरूमबाबत जर अशी समस्या असेल तर विचार करा सार्वजनिक स्वच्छतागृहांचे काय हाल असतील बरं..? म्हणून आपण स्वतःच काही गोष्टींची काळजी घेत टॉयटेल हायजिन पाळणे आवश्यक आहे. अशावेळी आपण टॉयलेट हायजिन प्रॉडक्टचादेखील वापर करू शकतो. फक्त विकत घेताना एक्स्पायरी डेट पहायला विसरू नका आणि सोबत ते वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. आता जाणून घेऊ टॉयलेट हायजिन नक्की कसे पाळावे ते खालीलप्रमाणे:-
० टॉयटेल हायजिन कसे पाळाल..? Toilet Hygiene
टॉयटेल हायजिन पाळणे काही कठीण बाब नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. खूप लहान आणि सोप्प्या नियमांचे पालन केले असता टॉयटेल हायजिनची भीती वाटत नाही. चला तर जाणून घेऊ हायजिन टिप्स खालीलप्रमाणे:-
१) सार्वजनिक टॉयलेट सीट टाळा – शक्यतो सार्वजनिक ठिकाणी वा सार्वजनिक स्वच्छता गृहाचा वापर टाळा. कारण टॉयलेट कव्हर अस्वच्छ असेल तर तुमच्या शरीरात विषाणू सहज शिरकाव करू शकतात. मात्र पर्याय नसेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे टॉयलेट सीट वापरण्याऐवजी थेट सरफेसचा वापर करावा. तसेच आजुबाजुला हात लावू नये आणि सॅनिटायझरचा वापर करावा. यामूळे सार्वजनिक स्वच्छता गृहे वापरणं सोयीचं होतं.
२) टॉयलेट सॅनिटायझर स्प्रेचा वापर – आपल्या घरातील टॉयलेटचा वापर वारंवार होत असतो आणि म्हणून ते वारंवार स्वच्छ केले जाते. मात्र सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट स्वच्छ असेलच याची शाश्वती नाही. म्हणूनच घर असो वा सार्वजनिक स्वच्छतागृह प्रत्येक वेळी टॉयलेट वापरण्यापूर्वी ते टॉयलेट सॅनिटायझरच्या मदतीने निर्जंतूक करून घ्या. यामुळे बरीच प्रमाणात जंतूंचा नाश होतो. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट सीटसह नळ, दरवाज्यांचे नॉब, वॉश बेसिन अनेकदा वापरलेले असते. त्यामुळे अशा वस्तूंचा वापर करतानाही सॅनिटाझर स्प्रे वापरणे सोयीचे राहील. (Toilet Hygiene)
३) महिलांसाठी पोर्टेबल युरिनरी डिव्हाइस – अनहायजेनिक टॉयलेटचा अत्याधिक प्रभाव महिलांच्या आरोग्यावर होत असतो. त्यात जर मासिक पाळीचे दिवस सुरु असतील तर सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटचा वापर करणे आणखीच भीतीदायक वाटते. याचे कारण म्हणजे, अशा ठिकाणी असणाऱ्या अस्वच्छतेमुळे महिलांना युरिनरी इनफेक्शन तसेच व्हजायनल इनफेक्शनचा धोका जास्त असतो. म्हणून शक्यतो मासिक पाळीच्या दिवसात आणि प्रवासादरम्यान पोर्टेबल युरिनरी डिव्हाइसचा वापर करावा. या डिव्हाईसच्या सहाय्याने महिलादेखील उभं राहून यात लघवी करू शकतात. ज्यामुळे टॉयलेट सीटचा वापर टाळणं अगदीच शक्य होतं.
४) क्लीनिंग ब्रशसाठी क्लिंझरचा वापर करा – घरातील टॉयलेट वा बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरत असलेल्या ब्रशवर जीवजंतूंचा मोठा साठा तयार होतो. यामुळे स्वच्छ न केल्यास स्वच्छ वाटणारे टॉयलेट डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूंचे घर होऊ लागते. परिणामी संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते. म्हणून टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा ब्रश स्वच्छता करून झाल्यानंतर पूर्ण रात्र क्लिंझर अर्थात कीटाणुनाशक वा ब्लीचमध्ये बुडवून ठेवा.
५) टॉयलेट रिमसुद्धा स्वच्छ ठेवा – टॉयलेट सिटप्रमाणे रिमवरदेखील स्वच्छता करणे आवश्यक आहे. कारण यावर देखील बॅक्टेरिया लागलेले असतात. तसेच रिम स्वच्छ करता येईल असे ब्रश वापरल्यास ते योग्य प्रकारे स्वच्छ करता येईल. यासाठी जुना टूथ ब्रश वापरता येईल. तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे रिम असो वा टॉयलेट सीट सफाई करताना हातात नेहमी ग्लोव्ज वापरावे.
आशा आहे कि, आता हायजिन (Toilet Hygiene) सांभाळताना तुम्हाला भीती वाटणार नाही. तसेच वर सांगितलेल्या टिप्सचा तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्की फायदा होईल.
‘हे’ पण वाचा :-
टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसाल तर आयुष्य कमी होईल; जाणून घ्या
पब्लिक टॉयलेट वापरताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या