प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारावर करा पारंपरिक उपचार; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलती जीवनपद्धतीमूळे अनेक पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या (Prostate Cancer) आजाराची समस्या उदभवताना दिसत आहे. या आजाराने ग्रस्त झालेल्या पुरुष रुग्णांची संख्या दिवसागणिक केवळ भूमिती श्रेणीने वाढत आहे. म्हणून आज आपण या आजारावरील पारंपारिक उपचार जाणून घेणार आहोत. मुख्य म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीच्या रुग्णांची पाच प्रकारे दखल घेतली जाते.
१) शरीरात तयार होणारे मूत्र व मूत्र प्रवृत्तीनंतर तुंबूणार्या लघवीचे प्रमाण – संदर्भात मूत्र प्रवृत्तीनंतर तुंबून राहणार्या लघवीचे प्रमाण जर ५०० सी.सी. पेक्षा जास्त असेल तर केव्हा न केव्हा प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका संबंधित रुग्णाला असतो.
२) मधुमेह – प्रोस्टेट ग्रंथीबरोबर जर मधुमेह आणि स्थूलता असेल तर रुग्णाचा रोग कष्टसाध्य आणि अधिक काळ घेणारा असतो.
३) मलावरोध – रुग्णाला मलावरोधाची सवय असेल तर प्रोस्टेटची सूज कमी करणे अवघड होते.
४) अवेळी आहार – यावेळी आहार घेण्याने प्रोस्टेट ग्रंथींची सूज वाढून हा त्रास वाढण्याची शक्यता असते.
५) व्यसने – तंबाखू, बिडी, सिगारेट, मशेरी किंवा दारू यासारखी व्यसने असणार्यांना तर कधीच विकारमुक्तीचे लाभ प्राप्त होत नाहीत.
* पारंपरिक गुरुकुल उपचार – प्रोस्टेट ग्रंथींची वाढ कमी होते की नाही, हे बघण्याकरिता पुढील पद्दतीने औषधी योजना ३ महिन्यांपर्यंत नेटाने करावी.
– आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळा, गुग्गुळ प्रत्येकी ३ गोळ्या आणि रसायन चूर्ण १ चमचा सकाळ – सायंकाळ घेणे.
– दोन्ही जेवणानंतर अभयारिष्ट ४ चमचे व आम्लपित्तवटी ३ गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्याव्या आणि रसायन चूर्ण १ चमचा सकाळ – सायंकाळ घेणे.
– दोन्ही जेवणांनंतर अभयारिष्ट ४ चमचे आणि आम्लपित्तवटी, त्रिफळा चूर्ण मलावरोध तक्रारीकरिता घ्यावे.
– मधुमेही व्यक्तींनी मधुमेहवटी हे जादा औषध घ्यावे. खूप स्थूल व्यक्तींनी त्रिफळा गुग्गुळ आणि गोक्षुरादि गुग्गुळ आणि गोळ्या प्रत्येकी ६ अश्या दोन वेळा असे दुप्पट प्रमाण करावे.
– सायंकाळी लवकर आणि कमी जेवावे. भोजनानंतर कटाक्षाने किमान किमान ३० मिनिटे चालावे.
– ग्रंथोक्त उपचार पद्धती : अभयारष्टि, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादिगुग्गुळ, रसायनचूर्ण, मधुमेह असल्यास बेलाच्या ८ ते १० छोट्या पानांचा काढा नियमितपणे ग्रहण करावा.
– पथ्य व कुपथ्य : आहार सात्विक घ्या. ज्वारीची भाकरी, मुगाचे फिके वरण, दुधी भोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, कोहळा, चाकवत, मेथी अशा उकडलेल्या भाज्या, पुदिना, आले, लसूण अशी चटणी, सुंठयुक्त कोमट पाणी आणि कटाक्षाने शाकाहार करणे फायद्याचे. तर अवेळी, उशिरा जेवणे पचनशक्तीच्या बाहेर जेवण, खूप चमचमीत, तेलगट, तूपकट मिठाईयुक्त, मांसाहार, हॉटेलमधील जेवण टाळा.
– योगाभ्यास : दररोज सकाळी व्यायाम करावा. व्यायाम करताना रुंद पट्टीचा लंगोट वापरावा.
– नैसर्गिक उपचार पद्धती : सात्विक राहणी, खाण्यापिण्यात संयम, सायंकाळी सूर्यास्तापास कमी प्रमाणात जेवण, शाकाहार, ई.
लक्षात ठेवा : संयमित जीवन आणि व्यसनांपासून दूर राहा. सायंकाळी लवकर आणि कमी जेवा जेणेकरून प्रोस्टेट ग्रंथीची भीती संबंधित पुरुषाच्या मनातही येणार नाही. कारण संयमच आरोग्यास अत्यंत फलदायी आणि परम औषध आहे.