जुनी लिपस्टिक वा लिपबामचा वापर ओठांसाठी घातक; जाणून घ्या दुष्परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आहोत त्याहून अधिक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणाऱ्यांची संपूर्ण जगात काहीच कमी नाही. पण तुमची हि आवड तुमच्याच अंगलट येऊ शकते बरं का. आता मेकअपमध्ये सर्व साधारणपणे आवश्यक समजल्या जाणाऱ्या बाबी कोणत्या..? तर.. फाउंडेशन लिक्विड पावडर, टोनर, आय शॅडो, लायनर, मस्कारा, ब्लश, लिपस्टिक आणि ग्लॉस. यापैकी लिपस्टिक वा ग्लॉस म्हणजेच लीप बाम अशी वस्तू आहे जी अतिशय लोकप्रिय आहे. म्हणजे अगदी इथल्या इथेच जायचं असेल आणि वेळ कमी असेल तर साहजिकच स्त्रिया पूर्ण मेकअप न करता एखादी हलकी वा डार्क लिपस्टिकची शेड लावतात आणि बाहेर पडतात.
तुम्ही वापरत असलेली लिपस्टिक साधारण किती दिवस चांगली राहते..? असे विचारायचे कारण म्हणजे अनेकदा दैनंदिन गडबडीत आपल्या रोजच्या वापरात असलेल्या वस्तूंची एक्स्पायरी आपल्या लक्षात राहत नाही. यामुळे साहजिकच आपल्या आरोग्याचे नुकसान होते. ओठांचे आरोग्य बिघडते.
लिपस्टिकमध्ये वापरले जाणारे प्रिझर्व्हेटिव्ह एका कालावधी नंतर एक्सपायरी डेट निघून ओठांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडवतात. म्हणूनच आज आपण जुन्या लिपस्टिकचा वापर हानिकारक का आहे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया.
० जुन्या लिपस्टिकचा वापर करणे हनिकारक असते..
कारण, एखाद्या वस्तूवर लिहिलेली एक्सपायरी ही ती वस्तू कधी खराब होईल याचा संकेत देते. त्यात मेकअप किंवा कॉस्मेटिक्सचे कोणतेही साहित्य वापरताना त्याची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर ती घातक रूप धारण करते.
कॉस्मेटिक्स जुने झाल्यानंतर त्यामधील हानिकारक केमिकल्स विपरीत परिणाम दाखवू लागतात. जुन्या झालेल्या लिपस्टिकचे वॅक्स विरघळू लागते आणि त्यावर पाणी साचू लागते. यामुळे अशी लिपस्टिक वापरल्याने ओठाच्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
० जुन्या लिपस्टिकचा वापर केल्यामुळे काय होते..?
एक्स्पायरी देत निघून गेलेल्या जुन्या लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठांच्या आरोग्यासह शारीरिक आरोग्य देखील खराब होऊ शकते. जाणून घ्या दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-
1. ओठांची त्वचा खराब होते आणि ओठ काळे तसेच सुरकुतलेले दिसू लागतात.
2. लिप्स्टीकमधील घातक केमिकल्स शरीरात जाणून विविध आजारांना आमंत्रण देतात.
3. जुन्या लिप्स्टीकमधील खराब झालेले लीड पोटात गेल्यास अल्सर आणि पोटाचा कँसर होण्याची शक्यता बळावते.
4. गरोदर महिलांनी अशा लिपस्टिकचा वापर केल्यास बाळाच्या वाढीवर परिणाम होतो.
5. अशा लिपस्टिकमधील लीड वा बिस्मथ ऑक्सीक्लोराईड शरीरात गेल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
6. याशिवाय लिपस्टिकमधील विषारी घटक शरीरात गेल्यास ब्रेस्ट कँसर आणि लिव्हर निकामी होण्याचीही शक्यता वाढते.