Use onions to avoid summer heatstroke
| |

खिशात कांदा ठेवल्यावर रखरखत्या उन्हातही थंड वाटतं? जाणून घ्या यामागचं खरं लॉजिक

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्या गोव्यापासून मुंबई पर्यंत अन कोकणापासून नागपूर पर्यंत सगळीकडंच उन्हानं कहर केलाय. (Use onions to avoid summer heatstroke). दुपारी सूर्य एवढी आग ओकतोय कि प्रत्येकजण ताक, सरबत, दही, उसाचा रस असं काहीतरी पोटात ढकलून आपआपला जीव थंड करून घेतोय. अशात उन्हाने पार त्रासून गेलेल्या तुम्हाला घरातलं कोणी आजी आजोबा, खिशात कांदा ठेव..बाहेर खूप उन्ह आहे असं म्हणत असेल तर तुम्ही त्यांना काय प्रतिक्रिया द्याल बरं? खरंच कांदा खिशात ठेवल्यानं रखरखत्या उन्हातही थंड वाटतं का? हि अंधश्रद्धा, श्रद्धा वगैरे आहे कि यामागं काही विज्ञानही दडलंय? आज आपण हेच जाणून घेणार आहोत. (Use Onions to Avoid Summer Heatstroke).

हा लेख वाचून केवळ कांदा खिशात ठेवून आता आपण थंड राहू असा विचार करत असाल तर थांबा. हे असं नाहीये.

उन्हाळा. आपण कितीही नको म्हटलं तरी निसर्गाच्या चक्रानुसार पावसाळा, हिवाळा गेला कि तो येणारच. गावाकडं गरगर, तर मुंबईच्या चौपाटीवर थंड सोडा सरबत पिऊन तुम्ही स्वतःला जरा गार करत असालच. पण घरातील कोणी वयस्कर माणूस तुम्हाला खिशात कांदा ठेवायला सांगत असेल तर तुमच्यातील कोणी तो कुठेतरी बागेत ठेऊन मोकळे होत असाल तर कोणी निव्वळ अंधश्रद्धा म्हणून त्यांना वेड्यात काढत असाल. उन्हाळ्याच्या दिवसांत थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा असं डॉक्टर सांगत असतात. पण थंड म्हणजे फक्त फ्रिजमधून काढलेली गार गोष्टच असते का? तर नाही. कांदा हा सुद्धा गरमीपासून बचाव करण्यासाठी ओळखला जातो. (Use Onions to Avoid Summer Heatstroke)

ice

आजी आजोबांच्या म्हणण्याचा शब्दशः अर्थ न घेता तुम्ही कांदा खिशात ठेऊन प्रवास करत असाल तर नक्कीच कांदा तुम्हाला गरम होऊ देणार नाही…

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाचा तडका  जास्त असतो. उन्हामुळे चक्कर येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यावेळी थंड पाणी आहारात ठेवले जाते, पण कांदा आणि पाणी  शरीराला थंड ठेवण्यासाठी लाभकारी आहे. उष्मघाताच्या समस्या या दूर होण्यासाठी अनेक मंडळी खिशात कांदे ठेवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कांदा खाण्याने उष्णतेच्या समस्या कमी होतात. अनेक विकार पण दूर होतात.

शरीराचे तापमान कमी ठेवण्याकरता गुणकारी (Do onions prevent heat stroke?)

गावाकडे उन्हाळ्याच्या दिवसांत रानात भाकरी आणि कांदा खाल्ला जातो. कांदा खिशात ठेवण्याने काहीच फायदे होत नाही. पण कांदा खाल्ला गेल्याने अनेक समस्या दूर होतात. असे तज्ञ लोक म्हणतात. कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे तत्व असते. जे शरिराचे तापमान कमी करण्यास मदत करतात. सोबतच त्वचेवर होणाऱ्या रॅशेसच्या समस्या देखील दूर ठेवतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदा खाल्याने शरिरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भासत नाही.

Curry Leaves With Onion

पायांच्या भेगांवरही कांदा उपयोगी –

ज्या लोकांच्या पायाला आणि टाचेला भेगा आहेत, त्या वेळी कांद्याचा रस भेगांना लावला जातो. त्यामुळे भेगा कमी होत जातात. उन्हाळा सुरु झाला कि, कांद्यांचा रस पायांना लावून मालिश करा. तीव्र उष्णता आणि गरमी यापासून संरक्षण होते. ज्यावेळी शरीरावर मोठ्या प्रमाणात रॅशेस येतात. त्यावेळी मात्र शरीरावरच्या रॅशेस दूर करण्यासाठी कांद्याचा रस शरीराला लावला असता , तो भाग थंड पडण्यास मदत होते. त्यामुळे पुरळ जास्त प्रमाणात निर्माण होत नाहीत.

चक्कर आल्यानंतर कांद्याचा वास देतात –

अनेकदा आपण पाहतो कि कोणाला अचानक चक्कर आली कि त्याच्या नाकपुडीजवळ कांद्याची फोड धरली जाते. कांद्याचा वास येताच झणझण्या येऊन बेशुद्ध पडलेला व्यक्ती लगेच शुद्धीवर येतो. यामुळेच आपण उन्हातून प्रवास करत असू अन उष्णतेमुळे जर चक्कर आली तर सोबत कांदा असेल तर त्याच्या वासाने शुद्धीवर येण्यास मस्त होऊ शकते.

खिशात कांदा ठेवल्याने उन्हाळ्यातील उष्माखातापासून वाचता येतं का? (Use Onions to Avoid Summer Heatstroke)

तुम्ही रखरखत्या उन्हातून कुठे प्रवासाला निघाला असाल आणि हॅलो आरोग्याचा हा लेख वाचून केवळ कांदा खिशात ठेवून आता आपण थंड राहू असा विचार करत असाल तर थांबा. हे असं नाहीये. कांदा केवळ खिशात ठेऊन काहीच होणार नाहीये. पूर्वी लोकं खिशात कांदा ठेवा असं म्हणायचे. त्यामागे, खिशात कांदा असेल तर प्रवासात भूक लागल्यानंतर तो खाल्ला जाईल. कांदा आहारात गेल्याने कांद्याच्या उष्णता कमी करण्याच्या गुणधर्मामुळे उष्माघाताचा त्रास होणार नाही असे लॉजिक होते. त्यामुळे आजी आजोबांच्या म्हणण्याचा शब्दशः अर्थ न घेता तुम्ही कांदा खिशात ठेऊन प्रवास करत असाल तर नक्कीच कांदा तुम्हाला गरम होऊ देणार नाही हे नक्की.

हे पण वाचा –

उष्णतेमुळे तोंडात होणाऱ्या जखमांवर ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम; जाणून घ्या