मुलांची फोनची सवय कमी करण्यासाठी या गोष्टीचा करा वापर
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळे जण मोबाइल चा वापर करतात. कोरोनाच्या काळानंतर अगदी लहान मुलांच्या अभ्यासापासून ते सगळी कामे हि मोबाइल वर होताना दिसत आहेत. मोबाइल म्हणजे अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. अगदी सहजपणे लहान मुले सुद्धा मोबाइल हाताळताना आपल्याला दिसत आहेत. पण हीच मोबाइल ची सवय हि आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी हानिकारक ठरत आहे. कारण मोबाइल वापरण्याचे वाढते प्रमाण ने मुलांचे आयुष्य हे कमी करत आहे. मुलांची मोबाइल ची सवय हि पूर्णतः कमी करण्यासाठी काय करता येऊ शकते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …..
सकाळी उठल्या उठल्या मुलांना इतर गोष्टीची आठवण होण्यापूर्वी त्यांचे सारे लक्ष हे मोबाइल कडे असते. मोबाईल हि जरी उपयोगी वस्तू असली तरी त्याचा वापर हा गरजेपुरताच असला पाहिजे. लहान मुलांना मोबाईल चे वेड जास्त असणे म्हणजे पण त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतो. अनेक वेळा मुलांचे अभ्यास जरी झाले तरी मुलांना गेम खेळणे किंवा चॅटिंग करणे , व्हिडीओ पाहणे अश्या पद्धतीचे नवीन काही तरी करण्याचा मुलांचा सतत अट्टाहास असतो.
— मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीत मग्न ठेवले पाहिजे.
— त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा.
— फोनसाठी ठराविक वेळच मुलांना दिला जावा.
— सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीत त्यांना जर गुंतवून ठेवले तर मुलांना चुकून सुद्धा मोबाईल ची आठवण होणार नाही.
— मुलांचा स्किन टाइम कमी करा.
— नवीन गेम मुलांना शिकवा .
—- त्यांना नवीन गोष्टी करायला शिकवा .
— त्यांना ज्या गोष्टी करायला आवडतात. त्या त्यांना करायला लावल्या पाहिजेत.
—- मुलांना फोन पासून दूर ठेवायचे असेल तर फोनमध्ये असलेले सेटिंग्स बंद करा.
—- मुलांच्या जवळ झोपताना मोबाइल देऊ नका.