कॉन्टॅट लेन्स वापरल्यास होऊ शकते डोळ्याचे नुकसान; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। उच्च प्रतीच्या प्लॉस्टिकपासून तयार केलेली अत्यंत पारदर्शक रचना म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स. लहान आकाराच्या या लेन्स डोळ्यात व्यवस्थित बसविलयास चष्माची भानगड नसते. यामुळे आजकाल अनेक लोक आपला चेहरा सुंदर दिसावा आणि चष्मा लावायला लागू नये म्हणून लेन्स वापरतात. मुळात आपली बदलती जीवनशैली आणि कामाचे स्वरुप आपल्या डोळ्यांवर परिणाम करत असतात आणि यामुळे नजर कमी होते. परिणामी चश्मा लागतो. पण अनेकदा लोक चश्माऐवजी कॉन्टॅट लेन्सचा पर्याय निवडतात. कारण चश्म्या लावल्यामुळे नाकावर आणि कानाच्या वर काही विशिष्ट डाग आणि खोक पडते . जे चांगलं दिसत नाही. परिणामी कॉन्टॅक्ट लेन्स जास्त लाभदायी वाटत. पण याच कॉन्टॅक्ट लेन्समुळे अनेक समस्या उद्भवू शकतात हे तुम्हाला माहित आहे का? कॉन्टॅट लेन्समुळे डोळे लाल होणे, खाज येणे, जळजळ होणे अशा अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यातील कोणतीही समस्या आढळल्यास त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या अन्यथा डोळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
१) डोळे सतत लाल होणे – कॉन्टॅट लेन्सच्या नियमित वापराने आपले डोळे लाल होतात. ही अगदीच सामान्य समस्या आहे असे समजून लोक त्याकडे असेच दुर्लक्ष करतात. पण याबाबतीत केलेली ही बेपरवाई डोळ्यांसाठी घातक ठरते. त्यामुळे कॉन्टॅट लेन्सच्या वापराने डोळे लाल होत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या.
२) डोळे सुजणे – कॉन्टॅट लेन्सच्या सतत वापराने डोळे कोरडे होतात. खरंतर सॉफ्ट व हार्ड कॉन्टॅट लेन्स घातल्याने डोळ्यात अश्रूंची कमतरता निर्माण होते आणि आपले डोळे साहजिकच कोरडे होऊ लागतात. त्यामुळे कॉन्टॅट लेन्सचा वापर शक्यतो टाळलेलाच बरा आणि वापरायचे असतीलच तर ते २४ तास वापरू नका.
३) डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोका – कॉन्टॅट लेन्स वापरताना डोळ्यांची योग्य स्वच्छता न राखल्यास डोळ्यांत संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे लेन्स लावण्यापूर्वी किंवा काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. तसेच लेन्स सोल्यूशनने व्यवस्थित स्वच्छ करा आणि मगच लावा. काढल्यानंतरही लेन्स स्वच्छ करूनच लेन्स केसमध्ये ठेवा.
४) डोळ्याच्या पापण्या सुजणे – डोळ्यांना लेन्स लावताना योग्य ती काळजी न घेतल्यास अनेकदा डोळ्यांच्या पापण्यांना सूज येऊ शकते. पापण्यांना सूज येत असल्यास लेन्स लावणे त्वरित थांबवा आणि काही दिवस लेन्स लावणे टाळा. अन्यथा पापण्यांची सूज अधिक वाढू शकेल.
५) कॉर्नियाशी संबंधित समस्या – लेन्समुळे कॉर्नियापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास कॉर्नियाचा आकार बदलू शकतो.
० महत्वाचे
– कॉन्टॅट लेन्सच्या वापराने वरील कोणतीही समस्या जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– कॉन्टॅट लेन्स डोळ्यात असताना डोळे चोळू नका.
– कॉन्टॅट लेन्स काढल्यानंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारा.