या सात प्रकारच्या ब्लाउज टिप्स वापरल्याने लुक दिसेल अभिनेत्रींसारखा
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल फॅशन चा ट्रेंड हा खूप आहे . फॅशन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत . फॅशन करताना आपल्याला शोभेल अशीच फॅशन करणे कधीही योग्य . त्यासाठी अनेक टिप्स आहेत . आजकल अनेक मुली या आपल्या आवडत्या व्यक्तीला फॉलो करत असतात . त्या जशा लुक करतील किंवा कपडे घालतील तशीच कपडे आजकाल वापरली जातात . महाराष्ट्रात कोणताही कार्यक्रम असेल तर त्यावेळी मात्र साडीच वापरली जाते . आजकाल साडीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत . तर त्याच्यवर कशा प्रकारचा ब्लॉउज शिवला पाहिजे . आणि त्याचा लुक कसा असेल तर जाणून घेऊया ….
यावर्षी डीप ब्लॉउज ची प्रथा हि आली आहे . डीप ब्लॉउज मुळे नककीच तुमच्या सौदर्यात फरक पडलेला जाणवतो. जर तुमची साडी नेट मधील असेल तर त्यावर डीप ब्लाऊज हा छान दिसतो तसेच त्याच्या सोबत त्याच्या कडेच्या काठाचा भाग हा जास्त मोठा असेल तर सुद्धा लगेच दिसण्यामध्ये फरक जाणवतो. असा ब्लॉउज हा प्रियांका चोप्रा हिने आपल्या लग्नात घातला होता. साडी जर जाड असेल तर त्यावेळी त्याच्यावर ब्लाउज हा पूर्ण पॅक बंद वापरला तरी त्याने चेहऱ्यात लगेच बदल हा जाणवतो.
साडीला कॉलर चा ब्लॉउज पण छान वाटतो . पण ज्याचे शरीर सडपातळ असेल तर त्या लोकांना कॉलरचा ब्लाउज हा जास्त चांगला दिसू शकतो. जर ब्लॉउज पीस अगदी फ्रेश कलर मध्ये असेल तर त्यावेळी ब्लॉउज हा बनवताना डाम्बल बटणे वापरून सुद्धा खूप सुदंर रीतीने तयार करू शकतो. छोटी छोटी बटणे हि ब्लॉउज च्या पाठीमागे लावली तर मात्र त्याने सौदर्य हे खुलते .