उत्तान पादासान – आसन एक फायदे अनेक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल आपली जीवनशैली इतकी बदलली आहे कि आरोग्याचाही काळजी घेणे यास प्राधान्य देणेच आपण विसरून गेलो आहोत. यामुळे आपल्या शरीराला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. दरम्यान आधुनिकतेच्या काळात अन्न, जीवनशैली, नीतीमूल्ये आणि जीवनशैलीच्या विकृतीमुळे संपूर्ण मानवजात अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त आहे. विशेषत: पोटाशी संबंधित अनेक विकार आपल्याला जडतात. हे आजार संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम करतात आणि आरोग्याची हानी होते. प्रामुख्याने अपचन, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, किडनी आणि आतड्यांशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता तीव्र असते. या सर्व आजारांपासून जर सुटका हवी असेल तर यावर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे योगासन. होय. योगाभ्यास आपल्या जीवनशैलीत सुधार आणतो आणि शरीराच्या आंतरक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतो. आता पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्यासाठी कोणता योग करावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यावर एकच उत्तर आहे उत्तान पादासन.
उत्तान पादासान करण्याच्या दोन पद्धती आहेत आणि या दोन्हीच्या सहाय्याने पोटाच्या विकारांपासून आराम मिळवता येतो. चला तर जाणून घेऊया उत्तान पादासन करण्याच्या पद्धती आणि त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
० उत्तान पादासन करण्याची पहिली पद्धत –
१) सर्व प्रथम तुमच्या पाठीवर सरळ झोपा.
२) यानंतर हात शरीराला अगदी समांतर ठेवा आणि तळवे जमिनीकडे तोंड करून ठेवा.
३) आता आपले दोन्ही पाय श्वास घेत असताना, हळूहळू वर करा (६० अंशांचा कोन बनवा).
४) आपले पाय अश्याच स्थितीत ५ ते ७ सेकंद धरा आणि आता श्वास सोडताना हळूहळू पाय मागे आणा.
– तुम्ही हा व्यायाम ४ ते ५ वेळा पुन्हा करू शकता. यानंतर क्षमतेनुसार वेळ वाढवता येईल.
० उत्तान पादासन करण्याची दुसरी पद्धत –
१) यासाठी आपल्या पाठीवर जमिनीवर झोपा.
२) पुढे दोन्ही हात नितंबांवर ठेवून कमरेचा वरचा आणि खालचा भाग जमिनीपासून सुमारे १ फूट उंच करा.
३) दरम्यान फक्त कमरेचा भाग जमिनीवर ठेवा.
४) यामध्ये कंबरेच्या बळावर संपूर्ण शरीराचे वजन पेलले जाते आणि याचा नाभीच्या जागेवर चांगला परिणाम होतो.
० उत्तान पादासन करण्याचे फायदे
१) मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी हे असं अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामुळे सर्व स्नायूंवर भर दिली जाते आणि रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते.
२) उत्तान पादासन केल्यास पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.
३) या आसनाच्या सरावाने पोट आणि छातीचा फुगवटा तसेच ओटीपोटाचा अनाठायीपणा दूर होतो.
४) या आसनाचा दररोज अभ्यास केल्यास पोटाच्या स्नायूंना खूप ताकद मिळते. याचा मुख्य लाभ म्हणजे उंची वाढते..
५) पोटातील लठ्ठपणा दूर करण्याव्यतिरिक्त हे आसन आतडे मजबूत करते आणि पचनशक्ती वाढवते.
६) नाभीला त्याच्या जागी संतुलित ठेवण्यासाठीदेखील हे आसन मदत करते. तुमची नाभी स्वतःच्या ठिकाणाहून हलली असेल तर केवळ ५ मिनिटे हे आसन करा. अगदी लगेचच पडलेला खडक त्याच्या योग्य ठिकाणी येतो.
७) उत्तान पादासन बद्धकोष्ठतेमध्ये अत्यंत फायदेशीर आहे.
८) या आसनाचा नियमित अभ्यास केल्यास वायू आणि अपचन हे त्रास मुळापासून नष्ट होतात.
० उत्तान पादासन करताना हे लक्षात ठेवा
– पाठदुखी आणि स्लिप डिस्क असलेल्या रुग्णांनी हा व्यायाम करू नये.