डायबिटीज कंट्रोल करायचाय? मग या पदार्थांचे सेवन जरूर करा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। डायबिटीज हा एक असा आजार आहे जो आजकाल अनेको लोकांमध्ये आढळतो. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे हा आजार जडतो. या आजाराच्या विळख्यात सापडल्यानंतर रूग्णांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. कारण डायबिटीज हृदयरोग, स्ट्रोक, किडनीचे आजार अश्या समस्यांना वाढवतो. यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. जेव्हा शरीर आवश्यक इन्सुलिन तयार करणे बंद करते किंवा त्याचा प्रभावीप्रकारे वापर करू शकत नाही तेव्हा लोकांना डायबिटीज होतो. डॉक्टर म्हणतात, एखाद्याला खुप जास्त लघवी, थकवा, तहान, सारखी भूक, अस्पष्ट दिसणे किंवा उशीराने जखम भरणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्याला डायबिटीज असण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण अश्या पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे खाल्ल्यास डायबिटीज कंट्रोल करता येईल.
१) आले – आले नियमित सेवन केल्याने इन्सुलिन नियंत्रित राहते. परिणामी डायबिटीजवर कंट्रोल करता येतो.
२) कारले – कारल्यामधील चारटिन आणि मोमोर्डिसिन हे रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्यास मदत करतात. डॉक्टर सांगतात कि, सकाळी रिकाम्यापोटी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर सहज कंट्रोल होते.
३) मेथी – मेथी शरीरात ग्लूकोज टॉलरन्स चांगले करते. यातील विरघळणारे फायबर कार्बोहाइड्रेटचे अवशोषण आणि पचन संथ करून ब्लड शुगर कंट्रोल करते. यामुळे दररोज १० ग्रॅम मेथीचे सेवन केल्यास डायबिटीज कमी होतो.
४) कडूलिंब – कडूलिंबातील फ्लेवोनॉईड्स, ग्लायकोसाईड आणि ट्रायटरपेनोइड्स या नावाचे केमिकल शरीरात ग्लूकोज वाढू देत नाही. यामुळे दिवसातून दोनवेळा कडूलिंबाची पावडर पाण्यासोबत घेतल्यास लाभ होतो. हि पावडर चहास्वरूपी देखील सेवन करू शकता.
५) दालचीनी – दालचीनी इंसुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते. यामुळे दिवसात २ वेळा २५० मिलीग्रॅम दालचीनी घेतल्यास फायदा होतो. परंतु जेवणापूर्वी हा प्रयोग करणे लाभदायक आहे याची नोंद घ्यावी.
६) जांभुळ – जांभुळ ब्लड शुगर नियंत्रित करते. यातील जॅम्बोलिन कंपाऊंड ब्लड शुगर कमी करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. यामुळे बिघडलेले फास्टिंग ग्लूकोज सुद्धा सुधारते.