सिगारेट सोडायची आहे..? तर ‘या’ टिप्स जरूर वापरून पहा
हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्हाला काय वाटत..? तुम्ही धूम्रपान करता म्हणजे तुम्ही सिगारेट जाळताय..? तर तुम्ही अत्यंत चूक आहेत. खरंतर सिगारेटचा धूर हा हळूहळू तुमची जीवनरेषा पुसत असतो आणि ते हि तुमच्या नकळत. जे लोक धूम्रपानाच्या आधीं असतात त्यांना सिगारेट ओढण्याशी त्यामुळे काय होऊ शकते याचा पूर्ण अंदाज असतो. मात्र तरीही व्यसनापायी ते दिगरेट ओढण्याचा मोह टाळू शकत नाहीत. यामुळे हळूहळू ती व्यक्ती स्वतःसोबत आपले कुटुंब उध्वस्त करू लागते. धूम्रपान करणे हि सवय आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. एका विशिष्ट काळानंतर हि सवय जीवावर बेतू शकते.
संपूर्ण जगात ९ मार्च हा दिवस ‘धूम्रपान निषेध दिवस’ म्हणून पाळला जातो. याचे कारण म्हणजे धूम्रपानाचे धोके आणि त्याचा प्रसार याबाबत जागरूकता पसरवणे. धुम्रपानामूळे कोलन आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कारण सिगारेट शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी तसेच डी सारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांना ब्लॉक करते. परिणामी हळूहळू शरीर आतून पोकळ होत जाते. यामुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढतात. म्हणून वेळीच हि सवय तोडणे गरजेचे आहे. जर तुम्हालादेखील धूम्रपानाची सवय असेल तर वेळीच सावध व्हा आणि आहारी जाऊ नका. यासाठी काय कराल ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) प्रबळ इच्छाशक्ती –
धूम्रपान करणे सोप्पे आहे मात्र सोडणे नव्हे. त्यामुळे इच्छाशक्ती प्रबळ आणि दांडगी करणे आवश्यक आहे. कारण ईच्छा तिथे मार्ग. यासाठी ज्या दिवशी तुम्हाला सिगारेट सोडायची आहे त्या दिवशी निर्धार करा आणि धूम्रपान करू नका. तसेच जर मित्रांची संगत धूम्रपान करण्यास प्रवृत्त करतेय हे निदर्शनास येत असेल तर स्वतःसोबत मित्रांनाही धूम्रपान करण्यापासून रोखा किंवा तुम्ही अशा मित्रांमध्ये जाणे थांबवा.
कारण जर मित्र व्यसनापासून मुक्त होऊ शकतात, तर ते केलेले सर्व प्रयत्न खराब देखील करू शकतात. म्हणून धूम्रपान करणारे मित्र आणि त्यांच्या सवयी आधी सोडा.
२) स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवा –
धूम्रपानाचे व्यसन टाळायचे असेल तर नियमित एक गोष्ट लक्षात ठेवा कि आपल्याला कामात व्यस्त राहायचे आहे. दिवसाची सुरुवातच अशी करा कि संपूर्ण दिवसात धूम्रपानाचा विचारही येणार नाही. यासाठी नियमित कसरत, ध्यान, पौष्टिक आहार आणि मन केंद्रित करण्याचा अभ्यास करा.
कोणत्याही कामात टाळाटाळ नको तर जोमाने काम करा. तसेच, वाचन, बागकाम इ. तुमच्या आवडीच्या कामात स्वतःला व्यस्त ठेवा, यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा टाळता येईल.
३) मुलेठी –
मुलेठी ही एक अशी औषधी वनस्पती आहे जीचे अनेक आरोग्यदायी लाभ आहेत. यातील अनेक गुणधर्म असे आहेत जे सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त करू शकतात. त्याची सौम्य गोड चव धुम्रपान करण्याची इच्छा मुळापासून दूर करण्यास मदत करते.
तसेच छातीत भरणे आणि खोकल्यामध्ये आराम देण्यासाठी मुलेठी हि औषधी वनस्पती फायदेशीर आहे. हि औषधी एखाद्या टॉनिकसारखी काम करते. यामुळे थकवा येत नाही. जे सहसा सिगारेट ओढणाऱ्यांसाठी एक निमित्त असते.
४) गोड मधाचे सेवन –
जर तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल आणि ती काही केल्या सुटत नसेल तर यासाठी तुम्ही मधुर मधाचा वापर नक्कीच करू शकता. कारण वास्तविकपणे मधामध्ये विविध जीवनसत्त्व, एन्झाईम्स आणि प्रथिने यांची मात्रा अधिक असते. हे धूम्रपान सोडण्यास मदत करतात.
अशा परिस्थितीत धूम्रपानाची सवय आपल्यापासून दूर करायची असेल तर फार विचार करण्यापेक्षा मधाचे बोट जिभेला लावा. ज्यामुळे सिगारेट ओढण्याचा मोह टाळता येईल.
५) ओवा –
ओव्यांमध्ये अनेक गुणधर्म असे आहेत जे आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकतात. तसेच यातील काही गुणधर्म सिगारेटची लागलेली सगळ्यात वाईट सवय मोडण्यातही मदतयुक्त ठरतात.
जेव्हा जेव्हा तुम्हाला सिगारेट, बिडी ओढण्याची तलप होईल तेव्हा ओवा हातावर चोळून त्याचा सुगंध घ्या आणि तोंडात ठेवा. अधून मधून ओवा हलकेच चव आणि त्याचा रस गिळा. असे केल्यामुळे सिगारेट पिण्याची सवय लवकर मोडीत निघेल.