स्टायलिश दिसायचे असल्यास असा करा पोशाख
हॅलो आरोग्य ऑनलाईन । प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपला लुक सुंदर दिसायला हवा असे वाटत असते. सुंदर दिसणे म्हणजे आपला चेहरा सुंदर असणे नव्हे . त्यासाठी आपल्याला आपल्या कपड्यांमध्ये वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरले गेले तर मात्र आपले दिसणे चार चौघांच्यात उठून दिसायला सुरुवात होते. प्रत्येकाला स्टाईल करणे हे आवडते. त्यासाठी आपल्याला कश्या पद्धतीचे पोशाख हे जास्त भारी दिसणार आहेत. याबद्धल माहिती करून घेऊया …
बाहेर जाताना —-
तुम्ही कधीतरी बाहेर फिरायला जात असताना . तुमच्या शरीराला योग्य असेल असाच पोशाख निवडा. बाहेर जर गड वगैरे अश्या ठिकाणी जाणार असाल तर तुम्ही त्यावेळी सुटसुटीत असणारा ड्रेस घाला किंवा जीन्स शर्ट घालून तुम्ही गड , किल्यांची सर करा.
उन्हात जाताना —
कधी कधी कामानिमित्त घराच्या बाहेर दुपारच्या वेळेत सुद्धा जावे लागते. अश्या वेळी उन्हाचा पारा जर जास्त वाढला असेल तर त्या वेळी तुम्ही तुमच्या सोबत तोंडाला रुमाल बांधा. स्कार्फ घालून तुम्ही घराच्या बाहेर वावरू शकता. त्यामुळे सूर्यापासून येणाऱ्या किरणांचे आपल्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा त्रास हा जास्त होणार नाही.
ऑफिस ला जाताना —-
तुम्ही दररोज च्या वेळी ऑफिस ला जात असताना तुम्ही ऑफिसिअल कपडे घालावीत . जास्त रंगेबिरंगी कपडे घालून ऑफिस जाऊ नका. त्यामुळे तुमच्या लुक वर खूप मोठा परिणाम दिसू शकतो. आपण ऑफिस ला जातो. कोणाच्या लग्नात नाही त्यामुळे खूप फॅन्सी कपडे हे जास्त वापरू नका. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे दिसाल. नॉर्मल ड्रेस किंवा जीन्स घालून तुम्ही दररोज ऑफिस ला जाऊ शकता.