दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काय आहेत उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । दातांचा पिवळेपणा असल्याने आपला व्यक्तिमत्त्वात लगेच खूप फरक जाणवतो. जर तुमचे दात हे पिवळे असतील तर त्यावेळी मात्र आपल्याला इतरांशी सुद्धा संवाद साधताना विचार करावा लागतो. अनेक वेळा आपण खुल्याने हसायला जातो, पण त्यावेळी मात्र आपले पिवळे दात इतरांची हसी हि रोखू शकते. अश्या वेळी आपण आपल्या दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काय करायला हवे ते जाणून घेऊया….
— सफरचंदाचे व्हिनेगर
आपण सफरचंदाच्या व्हिनेगर बद्दल ऐकलेच असेल ह्याचे बरेच आश्चर्यकारक फायदे आहेत. हे आपल्या दाताचा पिवळसरपणा दूर करते आणि दातांना चकाकी येण्यास मदत करते . आपल्या दातांची खोलवर स्वछता करण्यास सुद्धा व्हिनेगर मदत करते . आपल्या दातांची खोलवर स्वछता करायची असल्यास व्हिनेगरवापरावे. त्याने पांढरेशुभ्र होण्यास मदत करते .
— अम्लीय असल्याने पीएच समानता राखते, दात अधिक स्वच्छ आणि चकचकीत दिसतात.
— हे आपल्या हिरड्यांना देखील निरोगी ठेवते.
— एक कप पाण्यात अर्ध चमचा सफरचंदाचे व्हिनेगर घ्या आणि टूथ ब्रश च्या साहाय्याने दातांवर चोळा. जो पर्यंत दात पूर्णपणे स्वच्छ होत नाही.
— दातावरील डाग देखील याने जातात. दातांची चमक वाढते. परंतु हे वापरतांना काही काळजी घ्यावयाची आहे .जाणून घेऊ या काय काळजी घ्यावयाची आहे.
— सफरचंदाचे व्हिनेगर वापरण्यापूर्वी बाटली नीट ढवळून घ्या. नंतर वापरा. कारण जर व्हिनेगर खालीच तळाशी राहील तर मात्र त्याचा प्रभाव हा इतका आपल्या दातांवर पडणार नाही.
— पाण्यात न मिसळता हे वापरणे हानिकारक असू शकते. कारण हे नैसर्गिक आम्ल आहे. त्यामुळे कदाचित जास्त त्रासदायक होऊ शकते.