हात पायाला मुंग्या येणे म्हणजे नेमके आहे तरी काय ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । खूप वेळ जर आपण एका जागेवर बसलो असेल तर त्यावेळी मात्र आपल्या हाताला आणि पायाला मुंग्या येण्यास सुरुवात होते . पण त्या मुंग्या अचानक का येतात ? जर कोणतेही काम तुम्ही जर एका ठिकाणी बसून करत असाल त्यावेळी मात्र आपल्या पायांच्या नसी या दाबल्या जातात. आणि तेवढ्या भागातील रक्ताचे वाहन हे व्यवस्थित होत नाही . जो भाग बधिर होतो. अश्या वेळी शरीराच्या त्या भागातील रक्तप्रवाह हा दुसऱ्या दिशेने जायला सुरुवात होते. त्यालाच मुंग्या येतात असे म्हंटले जाते .
जर पायाची स्थिती हि जर नॉर्मल असेल तर मात्र त्यावेळी मुंग्या आपोआप जायला सुरुवात होते. मुंग्या येणे हि नॉर्मल स्थिती आहे .काही ठराविक वेळेनंतर मात्र हि स्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात होते . मुंग्या येण्याचा संबंध हा काही प्रमाणात वयाशी पण असतो. वय जास्त असेल तर मात्र या समस्या वारंवार पाहायला मिळतात.सतत जर अस्थितीत बसत असाल किंवा हाता पायावर अनैसर्गिक ताण असणे, अशा गोष्टी काही वेळा साठून येतात व मध्यमवयात मुंग्या येणे सुरु होऊ शकते. काही वेळा नसा दाबल्या जाऊन विचित्र संवेदना तयार होतात.
आजकाल सगळी पिढी हि जवळपास हि संगणकावर काम करते दिवस दिवस त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून उठत नाहीत . तसेच सतत हात हे संगणकावर आदळल्याने अशी अवस्था निर्माण होते . तासंतास, वर्षानुवर्षे ड्रायविंग करताना पण हातावर असा ताण येऊ शकतो. पाठीवर ताण आल्याने पण पायाला बधीरपणा येतो, मुंग्या येतात. त्यामुळे अश्या वेळी सकाळ संध्याकाळ आपल्या हाताला आणि पायाला मालिश करणे विसरू नका . मालिश केल्याने आपले शरीर बधिर होण्यापासून दूर होऊ शकते . तसेच सतत हा त्रास जाणवत असेल तर त्यावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या .