अल्सर म्हणजे काय?; जाणून घ्या प्रकार आणि कारणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण दिवसभर काय खातो? कधी खातो? काय करतो? आपले दैनंदिन जीवन ताण तणावाने ग्रासलेले आहे का? या सर्व गोष्टींवर आपले जीवनमान अवलंबून असते. आपले आरोग्य याच सर्व सवयीच्या समतोलावर आधारित असते. तुम्हाला माहित आहे का? खाण्यापिण्याच्या सवयीवर आधारीत असलेला एक भयंकर आणि त्रासदायक आजार म्हणजे ‘अल्सर’. याविषयी जर तुम्हाला माहित नसेल तर लगेच जाणून घ्या.
० अल्सर म्हणजे काय?
– अल्सर म्हणजे एक प्रकारची जखम. जी सतत दुखते. हि जखम वेगवेगळ्या भागांमध्ये होते. त्यानुसार या प्रकारांना नावे दिली आहेत. सर्वसाधारणपणे अल्सर मुखावाटे सुरु होतो आणि आतड्यांपर्यंत पसरतो. पचनसंस्थेतील कुठल्याही भागात अल्सर होतो. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढणे.
० अल्सरचे प्रकार – अल्सर म्हणजे शरीरात विविध ठिकाणी होणारी अंतर्गत जखम. त्यानुसार तिचे प्रकार मानले आहेत. सर्वसाधारणपणे अल्सरचे ३ प्रकार आहेत. खालीलप्रकारे :-
१) गॅस्ट्रीक अल्सर – पोटाशी निगडीत असलेल्या अल्सरला ‘गॅस्ट्रीक अल्सर’ म्हणतात. यामध्ये पोटदुखीचा त्रास होतो. H.Pylori’मध्ये इन्फेक्शन झाल्याने हा अल्सर होतो.
२) डुओडिनल अल्सर – छोट्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जखमेला ‘डुओडिनल अल्सर’ म्हणतात. यामध्ये छोट्या आतड्यांमध्ये सूज येते आणि त्याच्या आतल्या भागात फोड येतात.
३) इसोपजेनेल अल्सर – ‘इसोपजेनेल अल्सर’ घशाकडे होतो. या अल्सरकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. कारण हा त्रास कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतो.
० अल्सर होण्याची कारणे-
१) ताण/तणाव – अतिरिक्त ताणामुळे अल्सरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामाचे स्वरुप विना ताण-तणाव असेल याची काळजी घ्यावी. शिवाय तणावामुळे जेवणाच्या वेळा चुकतात. तसेच खाण्याचे चुकीचे पदार्थ ग्रहण केळूस अन्न पचत नाही आणि अल्सरचा त्रास होतो.
२) तिखट/तेलकट आहार – काही लोकांना झणझणीत जेवण आवस्ते. पण असे पदार्थ खाण्याची सवय अल्सरला आमंत्रण देतात. यामुळे तोंडाचा व पोटाचा कॅन्सर होतो. शिवाय तिखट पदार्थांसोबत तेलकट पदार्थ खाणे आरोग्यास अपायकारक असते. त्यामुळेही अल्सर होऊ शकतो.
३) अॅसिडीटी – चुकीच्या वेळी जेवण करणे आणि चुकीचे पदार्थ खाणे यामुळे अॅसिडीटीचा त्रास होतो. याचा परिणाम म्हणजे अल्सर होण्याची शक्यता. होय. जर वाढत्या अॅसिडीटीकडे दुर्लक्ष केले तर अल्सर म्हणजेच छाले किंवा जखम होते.
४) औषधांचा वापर – काही आजारात डॉक्टरांनी दिलेली औषध उष्ण पडतात. यांमुळे तोंड फुटण्याची शक्यता असते. अशी औषधे जास्त कालावधीसाठी घेतल्यास अल्सरचा त्रास होतो. तोंडाला सतत जखमा होतात. ओठांच्या कडा फुटणे, सतत रक्तस्राव होणे असे त्रास जाणवतात.
५) धूम्रपान आणि मद्यपान – धूम्रपान आणि मद्यपान यामुळे अल्सर होण्याची शक्यता असते. कारण धूम्रपान म्हणजे तंबाखू आणि त्यातही तो जाळून शरीरात घेणे यामुळे शरीराचे नुकसान होते. तर मद्यपान केल्याने अल्कोहोल शरीराची स्थिती बिघडविण्यास कारणीभूत असते.