अचानक होणाऱ्या मानदुखीची कारणं तरी काय?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि रात्री झोपून सकाळी उठल्यावर अचानकच मान दुखावलेली जाणवते. याशिवाय दिवसभर काम करुन थोडेसे निवांत झालात तर मानदुखीने अस्वस्थ व्हायला होते. तुम्हालाही असे त्रास जाणवतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण हि मानदुखी कितीही सर्वसाधारण वाटत असली तरीही ती कधी जीवघेणी होईल सांगता येत नाही. मुख्य म्हणजे आता यावर उपचार करायचे असतील तर आधी करणे माहित असायला हवीत ना. तर मित्रांनो अचानक उदभवणाऱ्या मानदुखीची करणे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग लगेच जाणून घेऊयात.
० मानदुखीची कारणं – तसे पाहता मानदुखीची अनेक कारणे असू शकतात. यातील मुख्य कारणे खालीलप्रमाणे:-
१) झोपण्याची चुकीची पद्धत – झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे मानदुखीचा त्रास होऊ शकतो. अनेकांना बसल्याजागी झोपायची सवय असते. यामुळे मानेला आधार मिळत नाही आणि मानेवर ताण येतो. याशिवाय मानेखाली हात घेऊन झोपणे, कडक उशीवर झोपणे, मेट्रेसवर न झोपता जमिनीवर झोपणे या काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला मान दुखीचा त्रास होऊ शकतो.
२) एकाजागी बराचवेळ बसून राहणे – आजकाल अनेकांचे काम लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर असते. दरम्यान एकाचजागी बसून आपण काम करत असतो. या कामांमध्ये सतत उठणे, चालणे होत नाही. बहुतेक कामांच्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या आरामदायी असतीलच असे नाही. यामुळे अनेकदा मान अधांतरीत राहते. त्यामुळे मानेवर ताण येतो आणि मानदुखीचा त्रास होतो.
३) मानेला दुखापत होणे – मानदुखीला शारीरिक दुखापत कारणीभूत असू शकते. दरम्यान मानेला इजा झाली असेल तर मानदुखीचा त्रास होतो. अनेकदा जीममध्ये व्यायाम करताना वा प्रवासात मानेला दुखापत होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
४) स्नायूंवर ताण – जीम किंवा व्यायाम करताना अनेकदा मानेवर ताण येतो. अशावेळी स्नायू ताणले की त्रास होतो. मानदुखीचा त्रास अनेकांना चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे होतो. त्यामुळे मान दुखीसोबत अन्य काही आजारही होण्याची शक्यता आहे.
५) जास्त वजन उचलणे – क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलल्यामुळे कंबर दुखी, पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास होतो. हि मान दुखी पटकन जाणवत नाही. पण तुम्ही ज्यावेळी वजन खाली ठेवले जाते तेव्हा मात्र खांदे, मान, पाठीचा कणा दुखू लागतो.