गाढ निद्रेसाठी काय केले पाहिजे ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला जर झोप योग्य प्रकारे झाली नाही , तर कोणतेच काम करण्याचा उत्साह हा आपल्यालावाटत नाही. अश्या वेळी आपल्याला अनेक समस्यांना समोर जावे लागते. तर सतत अस्वस्थ वाटते. त्यावेळी आपली झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड पणा वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे गाढ झोप घेणे गरजेचे आहे. रात्रीची दहा नंतर आणि सकाळी ५ च्या पूर्वीची वेळ हि गाढ झोपेसाठी योग्य राहतो. झोप हि पूर्ण आणि नीटनेटकी होण्यासाठी काही घरगुती उपाय …
—- आपण ज्या ठिकाणी झोपलो असेल त्या ठिकाणची जागा स्वच्छ असणे गरजेचे असते. आणि ती जागा पूर्णपणे आच्छादलेली सुंदर शय्या असलेली पाहिजे.
—- खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत असेल तर तुमची झोप हि खूप छान होऊ शकते.
—- स्वच्छ, शांत, मोकळी आणि आरामदायी खोली असेल तर लगेच झोप लागते.
— दररोज योग्य वेळेत झोपण्याची सवय पाहिजे आणि त्याच वेळेत लवकर उठण्याची सवय असणे पण गरजेचे आहे.
— दररोज तेलाने मालिश करून स्नान केले कि झोपेच्या वेळी जास्त ताण जाणवत नाही.
— झोप पूर्ण होण्यासाठी डोळ्यांवर पाणी शिंपडले गेले पाहिजे.
— तसेच झोपेच्या अगोदर मोबाइल हातामध्ये नसला पाहिजे.
— झोपेच्या वेळी सगळ्या लाइट बंद करून झोपल्याने लवकर आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
— कोणत्याही प्रकारचा आवाज हा आपल्याला मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
— झोपेच्या वेळा या ठरवल्या गेल्या पाहिजेत.