घसेदुखीच्या त्रासाने त्रस्त असाल तर काय कराल?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जनमानसांत इतकी भीती निर्माण झाली आहे कि, अगदी अंगदुखी किंवा घश्याला कोरड जरी पडली तरी लोकं घाबरतात. मग काय? यावर एकतर विविध तर्क लावले जातात आणि घरच्या घरी उपाय करण्याच्या नादात भलते सलते उपचार केले जातात. यामुळे अनेकदा आजार बरे होता होता बळावतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला अश्या काही बाबींबद्दल सांगणार आहोत. जे करणे प्रामुख्याने टाळणे गरजेचे आहे. जाणून घ्या :-
१) घरगुती उपचार – मुळात घसेदुखीचा समूळ त्रास घालवतील असे घरगुती कोणतेच उपचार नाहीत. यामुळे माहित नसतील असे ऐकीव उपचार करू नका. काय कराल?
– दिवसभरात तुलसी किंवा आल्याचा चहा, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे व त्रासादरम्यान वारंवार गरम पाणी पिणे हे फायद्याचे ठरते.
२) ऍन्टिबायोटिक्स औषधांचे सेवन टाळा – शरीराचे तापमान नेहमीपेक्षा जास्त असेल किंवा श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण झाला असेल तर यावर उपाय म्हणून अँटिबायोटिक्स घेऊ नये. शिवाय खूप ताप आला तर घरच्या घरी आधीच्या डोस मधील उरलेली औषधे घेऊ नयेत.
काय कराल?
– अशा स्थितीत योग्य उपचारासाठी डॉक्टरकडे जाणेच योग्य.
३) वेळेवर औषधे घ्या – डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेतल्याने कोणताही आजार बरा होण्यास मदत होते. यामुळे या गोष्टीची विशेष खबरदारी घ्या. शिवाय आजार बरा झाला आहे, असे समजून औषधाचा कोर्स मधेच बंद करू नका.
काय कराल?
– डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच औषधे घ्या आणि कोणत्याही औषधाचा कोर्स पूर्ण करणे टाळू नका.
४) जंक फूडचे सेवन – जंक फूड, तळलेले पदार्थ आणि शीतपेये यांच्या सेवनामुळे तोंडात जमा झालेल्या जंतूंना बळ येते आणि बॅक्टरीया वाढल्याने आजारही बळावतो.
काय कराल?
– प्रामुख्याने थंड शीतपेये आणि बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.
५) आहार – आजाराच्या काळात सामान्यत: रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमी असते. यामुळे पौष्टिक आहाराचे सेवन करणे शरीरासाठी योग्य ठरते. काय कराल?
– रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोमट पाण्यात १ चमचा मध टाकून प्या.