What to do to get rid of unwanted body hair?
|

शरीरावरचे नको असलेले केस घालवण्यासाठी काय करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  पुरुष असो किंवा स्त्री असो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटते. प्रत्येकाच्या मनातील सुंदरतेचा  वाक्य  या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जण सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आठवड्यातून एकदा तरी पार्लर ला जाऊन आपण सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न करत असतात. पण कधी कधी आपल्या शरीरावरचे जे अनावश्यक केस असतात. त्या केसांमुळे सुद्धा आपली सुंदरता कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्या शरीरावरचे असलेले अनावश्यक केस घालवण्यासाटी काय काय करू शकता याची माहिती घेऊया ….

आपल्या शरीरावरचे अनावश्यक केस दूर करण्यासाठी आजकाल खूप सारे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. वॅक्स करून किंवा केमिकल चा वापर करून आपण आपल्या शरीरावरचे अनावश्यक केस आपण दूर करू शकतो. त्यासाठी घरगुती उपायांचा सुद्धा आपण वापर हा करू शकतो. त्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून केस कमी करू शकता. त्यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा बॅड इफेक्ट होणार नाही.

हळद —-

हळद, बेसन सम प्रमाणात घेऊन त्यात किंचित तीळ किंवा एरंडेल तेल घालावे. हळद हि सगळ्या आजारांवर उपाय म्हणून वापरली जाते. हे मिश्रण एकजीव करून दाट पेस्ट तयार करावी. अनावश्यक केस असलेल्या भागात लावून ठेवावी. अर्धा तासाने थंड पाण्याने धुवावे. त्यामुळे ज्या भागात जास्त केस आहेत ते दूर होण्यास मदत होऊ शकते.

पुदिन्याचा चहा—

आपल्या घरात असलेला पुदिन्याचा चहा तरी करून अर्धा तास तरी पुदिना त्याच्यामध्ये मुरला पाहिजे असे तयार करून दररोज सायंकाळी हा चहा प्या. त्यामुळे काही आठ्वड्यातंच आपल्या शरीरावर असलेले काही केस हे कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आठवडा भर तरी हा प्रयोग करा.

कांद्याचा रस —-

कांदा बारीक वाटून त्याचा रस कढावा. हा रस तुळशीच्या तुळशीच्या पानांच्या रसाबरोबर अनावश्यक केस असलेल्या भागात लावल्यास चांगला उपाय होतो. क कांदा हा आपल्या शरीराला जास्त लाभकारी आहे. त्यामुळे खाण्यात सुद्धा कांद्याचा वापर हा जास्त करू शकता.

अंडयांचा बल्क —

आपल्या आहारात अंडे खाणे गरजेचे असते. अंड्यामधून आपल्याला प्रोटिन्स मिळतात. अंड्याचा पांढरा बलक, एक चमचा साखर आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर नीट एकत्र करून घ्यावे. अनावश्यक केस असलेल्या भागात हे मिश्रण लावावे. १५ ते २० मिनीटांनी कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवावे. आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास चांगला परिणाम दिसतात. अंडे हे आपल्या केसांसाठी सुद्धा पोषक घटक आहे.