साधारण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कधी ऍडमिट व्हावे?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या भीतीने आणि उपचार योग्य पद्धतीचे न मिळाल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पण जेवढे गरजेचे बेड आहेत आणि ऑक्सिजन ची गरज आहे , तेवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन अजूनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने विशेष काळजी घेतली पाहिजे.
कोरोनाची वाढती संख्या पाहता हॉस्पिटल यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण येत आहे. अनेक ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत. ज्या लोकांना नितांत ऑक्सिजन ची गरज आहे, त्या लोकांना ऑक्सिजन मिळत नाहीत. त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. हे दृश्य खूपच हृदयद्रावक आहे. त्यामुळे केंद्रीय रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना झाल्यावर नेमके कधी ऍडमिट होणे गरजेचे आहे, याबाबत सल्ला दिला आहे. टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. सीएस प्रमेश यांचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे त्यामध्ये त्यांनी काही सल्ले दिले आहेत, चांगल्या आहारासोबतच, योग-प्राणायम करणे, कोव्हिड-पॉझिटिव्ह रुग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासत राहण्याचा सल्ला दिला आहे.
ऑक्सिजन पातळी किती असावी ?
व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला भरती होण्याची गरज नाही. आणखी निट माहिती मिळवायची असल्यास, रुग्णाने आपल्या खोलीत 6 मिनिट चालावे त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चाचणी करावी. यानंतर तुमची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असेल तर, तुम्ही रुग्णालयाशी संपर्क करावा.
कोरोना रुग्णांनी कोणते औषध घ्यावे ?
व्हिडिओत म्हटले आहे की, जर रुग्णाची ऑक्सिजन पातळी ठीक आहे. तसेच तापाशिवाय अन्य कोणतेही लक्षण नाही. तर अशा परिस्थितीत पॅरासिटामॉल घेऊन घरी आराम करता येईल. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. साधारण दर्जाच्या खोकला किंवा ताप असेल तर भिण्याचे की काहीच कारण नाही.