गर्भारपणात विमान प्रवास करताना ….
हॅलो आरोग्य ऑनलाईन । महिलांना आपल्या गरोदर च्या काळात खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या खाण्या – पिण्याच्या सवयी या पूर्णपणे बदलाव्या लागतात. काही प्रमाणात व्यायाम करावे लागतात. गरोदर असताना महिलांना कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यास मनाई केली जाते. सुरुवातीचे काही दिवस हे महिलांना आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे महिलांना आपल्या आरोग्याबरोबर आपल्या बाळाची पण काळजी हि जास्त घ्यावी लागते. विमानाने प्रवास करताना कोणत्या प्रकारची विशेष काळजी हि आपण घेतली पाहिजे याबद्धल जाणून घेऊया ….
—- महिलांनी अश्या अवस्थेत एकट्याने प्रवास हा करू नये. जर प्रेग्नसीच्या काळात तुम्ही विमान अथवा इतर कोणत्याही साधनाने प्रवास करावा लागला तर तो एकटीने न करता कोणाच्या तरी सोबतीने करा. ज्यामुळे एखादी अडचण आल्यास तुम्हाला त्या व्यक्तीची मदत घेता येईल.
— प्रवास करण्यापूर्वी तुम्ही कमीत कमी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण त्यांना तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी व्यवस्थित माहिती असते. जर पुढे काही समस्या येणार असतील तर ते तुम्हाला आधीच याबाबत सावध करू शकतात. तसेच काही नियम सांगितले जातात त्यापद्धतीने तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
— विमान प्रवाासादरम्यान लावावा लागणारा सीट बेल्ट पोटाच्या खालील भागावर लावा.
— प्रवासात काही समस्या आल्यास डॉक्टरसोबत चर्चा करण्यासाठी त्यांचा संपर्कासाठी असलेला फोन नंबर जवळ ठेवा. ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
— कोणत्याही पद्धतीचा त्रास होत असेल तर त्वरित लगेच तेथील लोकांना सांगा.
— प्रवासासाठी फार लांबच्या प्रवासाची फ्लाईट बूक करू नका. कारण फार काळ एका ठिकाणी बसून राहणं तुमच्यासाठी या काळात मुळीच योग्य नाही. कमी वेळात करावा लागणारा प्रवास करण्यास मात्र काहीच हरकत नाही.
— प्रवास सुरू करण्याआधी तुमचा आहार, औषधे याची नीट काळजी घ्या. यासाठी प्रवासाला जाण्याआधीच सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करा. ज्यामुळे प्रवासादरम्यान तुमची तारांबळ उडणार नाही.
—- प्रवासाच्या काळात तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवा. सतत पाणी प्या. किंवा आपल्या जवळ पाण्याची बाटली बाळगा.
— प्रवासाच्या काळात द्रवपदार्थ कमी घेतल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.
—- आपल्याला योग्य आणि आरामदायी असतील तीच कपडे वापरा. घट्ट कपडे अजिबात वापरू नका.
— डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधे अजिबात घेऊ नका.
—- सहप्रवाश्याशी बोलण्यास संकोच करू नका.
— ज्या आवश्यक वस्तू आहेत त्याचा वस्तू तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला प्रवासात उपयोगी पडणार आहेत अशाच गोष्टी स्वतःसोबत कॅरी करा. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल.
—- प्रवासादरम्यान अनेक वेळा आपल्या हातापायांना सूज येऊ शकते. त्यामुळे थोड्या प्रमाणात हातांची आणि पायांची हालचाल करा.
—- रक्दाब वाढणार नाही किंवा कमी होणार नाही याची काळजी घ्या.