face wash

आपण वापरता असणाऱ्या फेश वॉश मधील कोणता घटक आहे महत्वाचा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नेहमी आपण वेगवेगळ्या प्रॉडक्ट चा वापर करतो. आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेश वॉश आले आहेत. ते फेश वॉश हे आपण आपल्या चेहऱ्यासाठी वापरतो.   त्यावेळी आपण आपल्या त्वचेसाठी नेहमी फेसवॉश चा वापर करतो. पण त्या फेसवॉश मधील असे कोणते घटक आहेत. ते आपल्या त्वचेला लाभाकरक आहेत . ते जाणून घेऊया ….

आपल्या फेसवॉश मध्ये कमीत कमी कोरफड किंवा स्ट्रॉबेरी सफरचंद , मध, केळी , असे काही घटक असलेले फेसवॉश नेहमी वापरले जावेत . या पदार्थांमध्ये नैसर्गिक घटक असतात . त्याचा वापर हा त्वचेसाठी केला जातो. त्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होत नाही. ज्यावेळी आपण एखादा फेसवॉश निवडत असाल तर त्यावेळी मात्र त्याच्यामध्ये कोणते प्रॉडक्ट आहेत याचा अभ्यास करूनच त्याचा वापर हा आपल्या त्वचेसाठी केला जावा . असे कोणते घटक त्याबद्धल जाणून घेऊया …

मध—-

त्वचेमधील तेलकटपणा कमी करुन त्वचा हायड्रेट आणि मॉश्चराईज करण्याचे काम मध करते. मध हे जेंटल क्लिनिंग एजंट असून त्यामुळे त्वचा छान उजळतेही आणि अधिक हायड्रेटिंग दिसू लागते. मध हा आयुर्वेदीक घटक आहे . त्याचा वापर हा आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी केला जातो. त्यामुळे त्वचेसाठी कोणते पण प्रॉडक्ट निवड करताना नेहमी त्यामध्ये मध असणे आवश्यक आहे .

कोरफड —

ज्या लोकांची त्वचा हि अतिशय नाजूक असते . त्या व्यक्तींनी आपल्या त्वचेसाठी कोरफड असणाऱ्या फेसवॉश चा वापर करावा. नेहमी कोरफड जर त्वचेला लावली तर त्यावेळी चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यास मदत करते .

स्ट्रॉबेरी —

लाईटनिंग एजंट म्हणून वापरली जाणारी स्ट्रॉबेरी ही चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी फारच चांगली आहे. जर तुम्ही टॅन झाले असाल किंवा तुमची त्वचा अन इव्हन असेल तरी देखील ती स्ट्रॉबेरीजच्या अर्कामुळे चांगली होईल. याशिवाय असलेल्या अन्य बेरीजमुळेही त्वचा चांगली होते. स्टोबेरी हि आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर असणार आहे .