हिरव्या सफरचंदातील कोणते पोषक घटक शरीराची कशी काळजी घेतात?; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपण सारेच जाणतो. पण अनेकदा असा प्रश्न उपस्थित राहतो कि दररोज खायचे सफरचंद लाल असावे का हिरवे? मुळात दोन्ही रंगाच्या सफरचंदामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक समाविष्ट असतात. मात्र आहार तज्ञ सांगतात कि, लाल सफरचंदापेक्षा हिरवे सफरचंद खाणे आरोग्यासाठी जास्त लाभदायी आहे. कारण यातील प्रत्येक घटक आपल्या शरीराची काळजी घेण्यास सक्षम आहे. आता यातील कोणता घटक आपल्या शरीराची कशी काळजी घेतो हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचणे गरजेचे आहे. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) फायबर
– हिरव्या सफरचंदामध्ये असणारं फायबर रक्तदाबावर नियंत्रण ठेवते. शिवाय भुकेलाही नियंत्रित करून अति खाणे पिणे टाळण्यास सहाय्य करते.
– याशिवाय फायबरमूळे हृदयरोगाचा धोका बराचसा कमी होतो.
२) व्हिटॅमिन सी
– हिरव्या सफरचंदातील व्हिटॅमिन सी हृदयाचे रक्षण करते. त्याचबरोबर शरीराचे वेगवेगळ्या संसर्गापासून आणि बऱ्याच आजारापासून रक्षण करते.
३) पोटॅशियम
– हिरव्या सफरचंदातील पोटॅशियम शरीरातील रक्तवाहिन्यांना आराम देते. शिवाय हाय ब्लडप्रेशर आणि ह्रदयविकरांपासून दूर ठेवते.
४) अँटिऑक्सिडंट्स
– हिरव्या सफरचंदात असणारे अँटीऑक्सिडंट कर्करोगासारख्या रोगांचा प्रभाव कमी करते. शिवाय ऑक्सिजनच्या कमतरतेपासूनदेखील वाचवते.
५) फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन
– हिरव्या सफरचंदाच्या सालीतील फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन हे पोषक तत्वं शरीरातील जळजळ कमी करण्यास सहाय्यक आहे. शिवाय यामुळे पक्षाघाताचा धोका कमी होतो.
६) अँटिएजिंग ऑक्सीडेंट
– हिरव्या सफरचंदात आढळणारे अँटिएजिंग ऑक्सीडेंट हे अकाली म्हातारपणापासून वाचवतात. शिवाय यामुळे त्वचेचे नुकसानदायी घटकांपासून संरक्षण होते.
७) सर्व तत्त्व
– मधुमेहाने ग्रासलेल्या व्यक्तीने दररोज एक हिरवे सफरचंद खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.