White nails determine your health
|

पांढऱ्या नखांवरून ठरते आपले आरोग्य

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।   अनेक वेळा मुली आपले आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांची काळजी घेणे फार गरजेचे असते. शरीराच्या सगळ्या अवयवांमध्ये नखांचा सुद्धा समावेश असतो. नखे हे आपल्या सौदर्यात भर घालतात. त्यामुळे पांढरी नखे असतील तर मात्र आपले आरोग्य हे अजिबात व्यवथित नाही असे मानले जाते. त्यामुळे आपली नखे आणि त्यांचा रंग बदलला कि , समजून जावे कि आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आजार आहे. त्याबद्धल जाणून घेऊया ….

—- नखांचा हरपलेला लालसरपणा हा ऍनिमिया आजार असल्याची लक्षणे सांगतो.

— अतिपांढरी नखे आणि गडद कडा या तुमच्या शरीराला यकृताच्या समस्या आहेत हे लक्षात करून देते. यकृतसमस्या असतील तर मात्र तुमच्या शरीराला अनेक वेगळ्या प्रकारच्या समस्या या जाणवू शकतात.

—- पिवळसर नखे म्हणजे बुरशी किंवा फ़ंगल इन्फेक्शन असल्याचे लक्षात येते.

— निळसर नखे हि ऑक्सिजन कमतरता आहे असे दाखवते.

—- सतत तुटणारी नखे हि थायरॉईड संबंधित आजार आणि आपल्या शरीरात कॅल्शियम कमी असल्याचे दाखवते.

— नखांच्या आजूबाजूची त्वचा लालसर होने- ल्युपस आर्थरायटीस आणि त्या गटातील अन्य आजार असू शकतात.